दुबई : सूर्यकुमार यादवच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारताने हाँगकाँगचा पराभव करत आशिया चषकाच्या सुपर-4मध्ये धडक दिलीये. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 192 रन्सची मोठी धावसंख्या उभारली होती. या लक्ष्याचा पाठलाग करताना हॉंगकॉंगची टीम 152 रन्सवर माघारी परतली.
या विजयासह भारताचं सुपर-4 मधील स्थान पक्कं झालं असून सुपर-4 मध्ये पोहोचणारा तो इंडिया दुसरी टीम ठरली आहे. अफगाणिस्तान आधीच इथपर्यंत पोहोचलाय, त्यामुळे आता भारतीय टीम त्यांच्या गटात नंबर-1 वरच राहणार हे निश्चित आहे.
आता सर्वांच्या नजरा 2 सप्टेंबरला होणाऱ्या पाकिस्तान-हाँगकाँग सामन्यावर असतील, कारण पाकिस्तान हा सामना जिंकला तर तोही सुपर-4मध्येही पोहोचेल. अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा 4 सप्टेंबर रोजी सामना होऊ शकतो. मुख्य म्हणजे हा सामना चाहत्यांकडून निश्चित मानला जातोय. वेळापत्रकानुसार, 4 सप्टेंबर रोजी 'अ' गटातील पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरील टीमचा सामना होईल.
आशिया स्पर्धेत भारताने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. दुबळ्या हॉंगकॉंगचा टीम इंडियाने 40 धावांनी धुव्वा उडवला आहे. सुर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने हॉंगकॉंगसमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
सुर्यकुमार यादवने 26 बॉलमध्ये हे 68 धावांची तुफानी खेळी केली आहे. या खेळीत त्याने 6 सिक्स आणि 6 फोर मारले आहेत. त्याआधी रोहित शर्मा 21 आणि के एल राहूलने 36 धावा केल्या आहेत. या बळावर टीम इंडियाने 2 विकेट गमावून 192 धावा ठोकल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना हाँगकाँग टीमची दमछाक झाली.