IND vs PAK U-19 Asia Cup Highlights: अजूनही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासंदर्भातील वादावर तोडगा निघालेला नाही. दरम्यान, आता भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. संपूर्ण भारतीय संघ पाकिस्तानच्या या सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या तीन फलंदाजांइतक्याही धावा करू शकला नाही. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता.
अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध भारत हा सामना काल 30 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात आला. यामध्ये पाकिस्तानने संघाने भारताचा पराभव केला आहे. मॅच विनरची सर्वात मोठी भूमिका निभावणारा आणि १५९ धावांचे मोठे शतक झळकावणारा शाहजेब खान सामनावीर ठरला.
हे ही वाचा: IPL मध्ये करोडात विकला गेलेला खेळाडूने खेळला भारत-पाकिस्तान सामना
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात तीन सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या बरोबरीने धावा करण्यातही संपूर्ण भारतीय संघाला यश आले नाही. शाहजेब खान आणि उस्मान खान यांच्याशिवाय मोहम्मद रियाजुल्लाने 27 धावांचे योगदान दिले. या तिघांनी मिळून एकूण 246 धावा केल्या. त्याचवेळी भारताचा डाव केवळ 238 धावांवर आटोपला. भारताला सुरुवातीपासूनच धक्क्यांचा सामना करावा लागला, निखिल कुमार (67 धावा) आणि मोहम्मद इनान (30 धावा) यांनी त्यांना विजयाकडे नेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही.
हे ही वाचा: लिलावात अनसोल्ड राहणं जिव्हारी लागलं, 'या' भारतीय खेळाडूने घेतला मोठा निर्णय; क्रिकेट विश्वात खळबळ
Pakistan U19 triumphs over India U19 by 43 runs in a closely fought contest! Shahzaib Khan’s knock and the bowlers’ grit turned the tide in their favor. A hard-earned win in a classic rivalry! #ACC #ACCMensU19AsiaCup pic.twitter.com/aaDt3hnVqV
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) November 30, 2024
हे ही वाचा: बीसीसीआयपुढे पीसीबी झुकलं, हायब्रीड मॉडेलला पाकिस्तान मान्य; पण ठेवल्या 'या' २ अटी!
भारताला उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहायचे असेल, तर उर्वरित गटातील दोन्ही सामने जिंकावे लागतील. आता भारताचा पुढील सामना 2 डिसेंबरला जपानशी होणार आहे. तर पुढे टीम इंडियाचा सामना 4 डिसेंबरला यूएईशी होणार आहे. पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारत सध्या अ गटात तिसऱ्या स्थानावर आहे. UAE आणि पाकिस्तान अनुक्रमे टॉप-2 मध्ये आहेत. दोघांचे २-२ गुण आहेत.