ind vs sa : भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात (Ind vs sa 2T-20 Match) भारताने 16 धावांनी विजय मिळवला आहे. भारताच्या 238 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 221 धावा करू शकला. यामध्ये डेव्हिड मिलरने (David Miller) 106 धावांची झुंजार शतकी खेळी केली. डिकॉकनेही 69 धावा केल्या मात्र भारताच्या बलाढ्य लक्षाचा पाठलाग करण्यात कमी पडले. भारताने हा विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेविरोधात मायदेशात पहिला मालिका विजय साकारला आहे. (Ind vs sa India beat South Africa by 16 runs marathi sport news)
भारताच्या 238 धावांचा पाठलाग करताना आफ्रकेची सुरूवात अत्यंत खराब झाली होती. कर्णधार टेम्बा बावुमा आणि रूसो यांना युवा गोलंदाज अर्शदीपने भोपळाही फोडू दिला नाही. मात्र डेव्हिड मिलर आणि सलामीवीर डिकॉकने भारताच्या वेगवान माऱ्याचा समाचार घेतला आहे. मिलर आणि डिकॉकच्या फटकेबाजीमुळे सामना आफ्रिकेच्या पारड्यात जातो की काय असं वाटत होतं. भारताची धावसंख्या जास्त असल्याने 16 धावांनी आफ्रिका संघ पराभूत झाला.
आफ्रिकेचा बॉलिंगचा निर्णय-
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीस उतरली होती. कर्णधार रोहित शर्मा आणि के एल राहूल सलामीला उतरले होते. यावेळी टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. रोहित शर्मा 43 धावा करून बाद झाला, त्याने 7 फोर आणि 1 सिक्स मारला होता. तर के एल राहूलने 28 बॉल 57 रन्स केल्या. या त्याच्या खेळीत त्याने 5 फोर 4 सिक्स मारले.
या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माने एक खास पराक्रम आपल्या नावावर केला आहे. (Rohit Sharma record indvssa) रोहित शर्माने आतापर्यंत क्रिकेटच्या सर्व स्पर्धांमध्ये खेळताना एकूण 400 टी-20 सामने खेळले आहेत. यामधील भारतासाठी 141 सामने, आयपीएलमध्ये मुंबईकडून 191 तर डेक्कन चार्जसतर्फे 47 सामने आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं नेतृत्त्व करताना 17 आणि इंडियन संघासाठी अधिकृत 2 आणि इंडिया एसाठी 2 असे रोहितने 400 सामने खेळले आहेत.
या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माने एक खास पराक्रम आपल्या नावावर केला आहे. (Rohit Sharma record indvssa) रोहित शर्माने आतापर्यंत क्रिकेटच्या सर्व स्पर्धांमध्ये खेळताना एकूण 400 टी-20 सामने खेळले आहेत. यामधील भारतासाठी 141 सामने, आयपीएलमध्ये मुंबईकडून 191 तर डेक्कन चार्जसतर्फे 47 सामने आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं नेतृत्त्व करताना 17 आणि इंडियन संघासाठी अधिकृत 2 आणि इंडिया एसाठी 2 असे रोहितने 400 सामने खेळले आहेत. रोहितने आपल्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये टी-20 मध्ये 400 सामने खेळताना 10,578 धावा केल्या आहेत. यामध्ये रोहितने 6 शतक 71 अर्धशतकं ठोकली आहेत.