Ind vs Sl 2nd T20 : श्रीलंकेविरूद्ध (IND vs SL)पुण्यात पार पडलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा 16 धावांनी पराभव झाला.या विजयानंतर आता श्रीलंकेने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. श्रीलंकेच्या या विजयासह टीम इंडियाच्या बॉलर्सनी टाकलेल्या नो बॉल्सची सर्वाधिक चर्चा झाली. टीम इंडियाकडून सर्वाधिक नो बॉल अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) टाकले होते.त्याने टाकलेल्या या नो बॉलवर टीम इंडियाचा कर्णधार हार्दीक पंड्या (Hardik Pandya) चांगलाच भंडकला होता. त्याचा सामन्या दरम्यानचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
बॉलर्सची निराशाजनक कामगिरी
श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाच्या (IND vs SL) गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती. या सामन्यात भारताकडून एकूण 7 नो बॉल टाकण्यात आले होते. त्यापैकी फक्त अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) 5 नो बॉल टाकले होते. या नो बॉल्समुळे श्रीलंकेला भारतासमोर मोठी धावसंख्या उभारता आली आणि त्यांचा पराभव झाला.
दुसऱ्या टी20 त एकट्या अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) 5 नो बॉल टाकले होते. या नो बॉलमुळे श्रीलंकेला मोठा फायदा झाला होता. टीम इंडियाच्या हाती आलेली मोठी विकेट देखील याच नो बॉलने हिरावली होती. त्यामुळे हार्दीक पंड्या (Hardik Pandya) अर्शदीपवर चांगलाच भडकला होता. या संदर्भातला व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओची एकच चर्चा आहे.
व्हिडिओत काय?
दुसऱ्या टी20 सामन्या दरम्यान एक क्षण असाही आला होता, जेव्हा हार्दिक (Hardik Pandya)चांगलाच संतापला होता. प्रत्यक्षात असे घडले की, श्रीलंकन संघाचा कर्णधार दाशून शनाका शानदार फलंदाजी करत होता त्याने 14 चेंडूत 30 धावा केल्या होत्या. त्यानंतर अर्शदीप सिंहच्या (Arshdeep Singh)ओव्हरमध्ये त्याने मोठा फटका मारला आणि तो सुयकुमार यादवच्या थेट हातात गेला. सुर्याने ती कॅच घेऊन त्याला आऊट केले. शनाका पॅव्हेलियनकडे निघाला आणि कर्णधार हार्दिक पांड्यासह संपूर्ण भारतीय संघ विकेटचा आनंद साजरा करू लागली. त्यानंतर अंपायरने नो बॉलचा इशारा दिला होता. हा अर्शदीपचा एकूण चौथा नो बॉल होता. यावेळी भारतीय संघ विकेटचा आनंद साजरा करत असताना अचानक कॅप्टन हार्दिकने डोके पकडले. अर्शदीपच्या चौथ्या नो बॉलमुळे तो खूपच निराश दिसला हे उघड आहे. यावेळी हार्दीक अर्शदीपवर संतापल्याचे कॅमेरात कैद झाले होते.याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
दरम्यान याआधीही अर्शदीपने (Arshdeep Singh)दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 नो बॉल टाकले होते. आता हार्दिक पंड्याने अर्शदीपच्या या चौथ्या नो बॉलवर प्रतिक्रिया देताच त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावेळी, दशून शनाकाने 22 चेंडूत 56 धावा करून नाबाद राहिला होता.
दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाचा पराभव करत श्रीलंकेने हा सामना 16 धावांनी जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेत आता दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. आता तिसरा टी20 सामना दोन्ही संघासाठी करो या मरो सारखा असणार आहे. या सामन्यात विजय मिळवणार संघ मालिका खिशात घालणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन: हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, अक्षर पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: दासुन शनाका (कर्णधार), पठुन निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजय डी सिल्वा, चरित अस्लांका, भानुका राजपक्षे, हसरंगा डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दिलशान मदुशंका