Ashwin on Rohit Sharma: टीम इंडियाने श्रीलंकेवर (India vs Sri Lanka) 317 धावांनी विजय मिळवला आहे. भारताचा वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. या विजयासह (India vs Sri Lanka) टीम इंडियाने श्रीलंकेला 3-0 ने व्हाईटवॉश दिला आहे. या विजयाची चर्चा असताना टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूने कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) एका निर्णयावर आक्षेप घेतला आहे. पहिल्य़ा वनडे सामन्यात मोहम्मद शमीने 'मँकाडिंग' पद्धतीने श्रीलंकेच्या कर्णधाराला आऊट केले होते. मात्र रोहितने अपील रद्द करायला लावला होता. रोहितच्या या निर्णयावर आता टीम इंडियाच्याच खेळाडूने आक्षेप घेतला आहे. हा खेळाडू कोण आहे? व त्याने काय आक्षेप घेतलाय? हे जाणून घेऊयात.
पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका (Dasun Shanaka) 98 धावावर खेळत होता. यावेळी टीम इंडियाकडून मोहम्मद शमी ओव्हर टाकायला होता. त्याने या ओव्हरमध्ये 98 वर नाबाद असलेल्या शनाका मँकाडिंग' पद्धतीने आऊट केले होते.मात्र रोहितने यात हस्तक्षेप करत शमीला अपील मागे घ्यायला लावले. आम्हाला शनाकाला असे आऊट करायचे नव्हते. तो शतकाच्या जवळ होता आणि आम्ही सामना जिंकत होतो, असे रोहित या घटनेवर म्हणाला होता.
टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) या निर्णय़ावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अश्विन आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, तुम्ही एलबीडब्ल्यू झाल्यास किंवा कॅच आऊट झाल्यास, 'कप्तान से कौन बनेगा करोडपती'मध्ये सरथ कुमार किंवा अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे अपीलवर तुम्हाला विश्वास आहे की नाही हे अंपायर विचारत नाहीत."जर गोलंदाजाने अपील केल्यास अंपायर त्याला आऊट देतो, हेच त्यांचे कर्तव्य आहे. जर एखादा खेळाडू देखील अपिल करतो तर अंपायरचे कर्तव्य आहे, त्याला आऊट देणे.
दरम्यान या घटनेत अश्विनने (Ravichandran Ashwin)अपायरला दोषी मानले आहे. खेळाडूला आऊट देणे आणि त्याच्या निर्णयावर ठाम राहणे हे अंपायरचे कर्तव्य आहे असे तो म्हणालाय'. त्याचवेळी अपील मागे घेतल्यानंतर रोहित म्हणाला होता की, 'आम्हाला शनाकाला अशा प्रकारे बाहेर काढायचे नव्हते. तो शतकाच्या जवळ होता. आम्ही सामना जिंकत होतो,असे तो म्हणालाय.
दरम्यान श्रीलंकेमधील तिसरा एकदिवसीय सामन्यात भारताने वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या 391 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 73 धावांवर आटोपला. भारताने 317 धावांनी विजय मिळवला आहे. भारतीय संघाने या विजयासह श्रीलंकेला 3-0 ने व्हाईटवॉश दिला आहे.