मुंबई : टीम इंडिया 16 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. भारतीय संघाने अलीकडेच तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला. आता कर्णधार रोहित शर्माच्या संघाला टी-20 मालिकेतही असेच काही करायला आवडेल. मात्र या मालिकेपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.
हा दिग्गज अष्टपैलू खेळाडू बाहेर
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर या मालिकेतून बाहेर पडला आहे. सुंदरला हाताला दुखापत झाली असून त्यामुळे तो बाहेर पडला आहे. सुंदर बाहेर पडणे हा संघासाठी मोठा धक्का आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या बाहेर पडल्यानंतर सुंदर भारतीय संघासाठी त्याची कमी भरुन काढू शकतो असं म्हटलं जात होतं. मात्र आता हा खेळाडू स्वत: या मालिकेतून बाहेर पडला आहे.
अलीकडेच, BCCI ने घोषित केले की उपकर्णधार KL राहुल आणि स्टार अष्टपैलू अक्षर पटेल यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतून वगळण्यात आले आहे. रोहित शर्मासाठी हा मोठा धक्का आहे कारण राहुल हा संघाचा सर्वात मजबूत फलंदाज आहे आणि रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत अक्षर पटेलसारखा अष्टपैलू खेळाडू टीम इंडियासाठी खूप प्रभावी ठरू शकला असता. मात्र आता हे दोन्ही खेळाडू या मालिकेतून बाहेर झाले आहेत.
या दोन खेळाडूंची संघात एंट्री
अक्षर पटेल आणि केएल राहुलला वगळल्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. मात्र त्यांच्या जागी बीसीसीआयने आणखी दोन खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. निवडकर्त्यांनी राहुल आणि अक्षर यांच्याऐवजी दीपक हुडा आणि ऋतुराज गायकवाड यांचा संघात समावेश केला आहे. गायकवाडला राहुलच्या अनुपस्थितीत त्यांचे स्थान पक्के करण्याची ही उत्तम संधी असेल. या खेळाडूला जास्त संधी मिळालेल्या नाहीत. दुसरीकडे, दीपक हुडाने वनडे मालिकेत केलेल्या चांगल्या कामगिरीचे फळ मिळाले.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (डब्ल्यूके), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुडा.