मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने आज भारतीय 'अ' संघाची घोषणा केली आहे. कसोटी सामन्याचं नेतृत्व हे करुण नायरकडे सोपवण्यात आले आहे तर एकदिवसीय सामन्यांचं नेतृत्व हे मनीष पांडेकडे सोपवण्यात आलं आहे.
मुंबईच्या संघातून गेले काही दिवस चांगली कामगिरी बजावणारे शार्दुल ठाकूर आणि श्रेयस अय्यर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच मुंबई इंडियन्सकडून चमकदार कामगिरी करणारा कृणाल पांड्याचीही भारतीय 'अ' संघात निवड झाली आहे.
जुलै महिन्याच्या शेवटी भारताच्या श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होत आहे, त्याआधी या दौऱ्यात आपली छाप पाडून भारतीय संघात आपली जागा निश्चीत करण्याचा करुण नायरचा प्रयत्न असेल.
कसोटी सामन्यांसाठी संघ
करुण नायर (कर्णधार), ईशान किशन (विकेट किपर), पी.के.पांचाल, अभिनव मुकुंद, श्रेयस अय्यर, अंकीत बावने, सुदीप चॅटर्जी, हनुमा विहारी, जयंत यादव, शाहबाज नदीम, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, अनिकेत चौधरी, अंकित राजपुत
एकदिवसीय सामन्यासाठी संघ
मनीष पांडे (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मनदीप सिंह, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दिपक हुडा, करुण नायर, कृणाल पांड्या, विजय शंकर, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, जयंत यादव, बसील थम्पी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, सिद्धार्थ कौल