कानपूर: टीम इंडियाने किवी संघाविरुद्ध टी 20 सीरिज 3-0 ने जिंकली आहे. रोहित आणि द्रवीड पर्वाची विजयी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं. आता पुढचे लक्ष्य कसोटी सीरिज असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड 25 नोव्हेंबरपासून कसोटी सामना सुरू होत आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सीरिजमधील पहिला सामना 25 नोव्हेंबरपासून कानपूर मध्ये खेळवला जाणार आहे. कानपूरमधील पहिला कसोटी सामना सकाळी 9 .30 वाजता सुरू होईल.
टीम इंडियाचा कर्णधार सलामीवीर केएल राहुलला दुखापत झाल्यानंतर टीम इंडियाच्या अडचणी वाढणार आहेत. दुखापतीनंतर, टीम इंडियाच्या समोर नवीन समस्या निश्चित करण्यात आली आहे.
कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्माला कसोटी सीरिजच्या पहिल्या सामन्यात आराम देण्यात आला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता ओपनिंगला कोण उतरणार हा प्रश्न आता असणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल ओपनिंगला उतरण्याची शक्यता. शुभमन गिल रोहित शर्माच्या जागी तर अग्रवाल के एल राहुलच्या जागी खेळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद सिराज, उमेश यादव