नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर हे कायमच त्यांच्या ठाम भूमिका णि परखड मतांसाठी ओळखले जातात. पण, यामुळंच आता ते काही घटकांचा रोष ओढावत असल्याचं पाहायला मिळत आहे. गौतम गंभीर यांनी स्वत: अतिशय मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. ही गोष्ट म्हणजे त्यांना मिळत असणारी जीवे मारण्याची धमकी.
गंभीर आंनी केलेल्या आरोपानुसार ISIS काश्मीरकडून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सदर प्रकरणी त्यांनी दिल्ली पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार गंभीर यांनी तक्रार दाखल करताच पोलिसांनी या प्रकरणी कारवाईची पावलं उचलली आहेत. पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांच्या माहितीनुसार गौतम गंभीर यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मंगळवारी हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. ज्यानंतर धमकीमुळं घराबाहेरील परिसराला छावणीचं स्वरुप मिळाल्याची बाब उघड झाली.
फोन आणि ईमेलच्या माध्यमातून आपल्याला ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
अद्यापही या प्रकरणी कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नसून, तपासानं मात्र वेग धरला आहे. तेव्हा आता पोलिसांच्या हाती तपासातून नेमकं काय काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.