मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पाचवा T20 सामना रंगणार आहे. पाच सामन्यांच्या T20 मालिकेत दोन्ही संघ 2-2 ने बरोबरीत आहेत. पाचवा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक असणार आहे. त्यामुळे या सामन्यावर कोणता संघ विजय मिळवतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पाचव्या टी20 सामन्यात टीम इंडिया संपूर्ण ताकदीने उतरणार आहे. मात्र एक खेळाडू या ताकदीत अडसर ठरू शकतो. भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर फॉर्ममध्ये दिसत नाही आहे. आफ्रिकेविरूद्ध सामन्यात त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही आहे. त्यामुळे त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असल्याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.
आफ्रिकेविरूद्धची कामगिरी
श्रेयस अय्यर चौथ्या टी-20 सामन्यात अवघ्या 4 धावा करून बाद झाला. तिसऱ्या T20 सामन्यातही टीम इंडियाला श्रेयस अय्यरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असताना तो 11 चेंडूत केवळ 14 धावा करून बाद झाला. दुसऱ्या T20 सामन्यात श्रेयस अय्यरने 35 चेंडूत 40 धावांची अत्यंत संथ खेळी खेळली.
दीपक हुडाला संधी
श्रेयस अय्यरची ही फ्लॉप कामगिरी पाहता त्याचा पाचव्या सामन्यात पत्ता कट होण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरच्या जागी दीपक हुडाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते, जो टीम इंडियासाठी एकहाती सामना जिंकू शकतो. दीपक हुडा हा प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडीसाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.