नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन वनडे सामन्यांसाठीच्या वेळेत बदल करण्यात आले. हवामानाचा अंदाज पाहता या पहिल्या दोन वनडेंच्या वेळेत बदल करण्यात आलाय.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी ही माहिती दिली. भारतीय संघाचा पहिला सामनै १० डिसेंबरला धरमशालामध्ये तर दुसरा सामना १३ डिसेंबरला मोहालीमध्ये खेळवण्यात येणार आहे.
बीसीसीआयने दोन्ही सामन्यांच्या वेळेतील बदलाबाबत हिमाचल प्रदेश क्रिकेट संघ(एचपीसीए) आणि पंजाब क्रिकेट संघ(पीसीए) यांच्याशी चर्चा केली. या दोनही सामन्यांची सुरुवात ११.३० वाजता होणार आहे.
बीसीसीआयच्या माहितीनुसार, उत्तर भारतातील खराब हवामानाची स्थिती पाहता तसेच यजमान संघानी केलेली शिफारस लक्षात घेता धरमशाला आणि मोहालीमध्ये होणाऱ्या दोन्ही सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दुपारी १.३०वाजता हे सामने सुरु होणार होते. मात्र वेळेत बदल करण्यात आल्याने हे दोनही सामने ११.४० वाजता सुरु होतील.
विशाखापट्टणमला १७ डिसेंबरला खेळवल्या जाणाऱ्या सामन्याच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा सामना नियोजित वेळेत १.३० वाजता सुरु होईल.
भारतीय संघ गेल्या काही दिवसांपासून कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर आहे. हेच स्थान कायम राखण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील आहे. भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत कसोटीत पहिल्या स्थानावर आहे. तर श्रीलंका ऑस्ट्रेलियानंतर सहाव्या स्थानी आहे. यातच भारतीय संघ श्रीलंकेला ३-० अशा व्हाईटवॉश देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल.