Rohit Shrma | रोहितच्या कॅप्टन्सीत या तिघांचं नशीब फळफळलं, कोहली शत्रू समजायचा

विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या कॅप्ट्न्सीत डावळलं किंवा कमी संधी दिली, रोहितने त्यांनाच संधी देत टीम इंडियाला (Team India) वर आणलं.  या 3 खेळाडूंपैकी 2 मुंबईकर आणि रोहितच्या अगदी जवळचे आहेत.

Updated: Mar 16, 2022, 03:51 PM IST
Rohit Shrma | रोहितच्या कॅप्टन्सीत या तिघांचं नशीब फळफळलं, कोहली शत्रू समजायचा title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : रोहित शर्मा (Rohit Shrma) कॅप्टन झाल्यापासून टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरुच आहे. न्यूझीलंड असो वेस्टइंडिज असो किंवा श्रींलका या तिन्ही संघांना रोहितने आपल्या कॅप्टन्सीत पाणी पाजलंय. रोहितने ज्या ज्या खेळाडूंवर संधी दिली, त्या त्या खेळाडूंनी त्याचा विश्वास सार्थ ठरवत चमकदार कामगिरी केली. विराट कोहलीने आपल्या कॅप्ट्न्सीत डावळलं किंवा कमी संधी दिली, रोहितने त्यांनाच संधी देत टीम इंडियाला वर आणलं.  या 3 खेळाडूंपैकी 2 मुंबईकर आणि रोहितच्या अगदी जवळचे आहेत. कोण आहेत हे तिघे हे आपण जाणून घेऊयात.  (indian cricket team captain hitamn rohit sharma give chance to ishan kishan shreyas iyer and suryakumar yadav)
 
विराटने बहुतांश वेळा विकेटकीपर म्हणून ऋषभ पंतला  (Rishabh Pant) अनेकदा संधी दिली. मात्र रोहितने सूत्र हातात घेताच युवा ईशान किशनकडे विकेटकीपिंगची जबाबदारी सोपवली. ईशानने विंडिज आणि श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेत चमकदार कामगिरी केली. ईशानने श्रीलंका विरुद्घ टी 20 मालिकेत ओपनिंगही केली.

मधल्या फळीतील कटकट संपली

टीम इंडियाला गेल्या अनेक वर्षांपासून मधल्या फळीतील फलंदाज सापडत नव्हते. अनेकांना वारंवार संधी देऊनही त्यांना अपेक्षित कामगिरी करता येत नव्हती. मात्र रोहितने असा बॅट्समन हुडकून काढला, ज्याने ही सर्व कटकट झटक्यात संपवली. सूर्यकुमार यादवने (Suryakurmar yadav)  मीडल ऑर्डरची जबाबदारी आतापर्यंत सार्थपणे पार पाडली आहे.  

सूर्याने आयपीएलमध्ये  मुंबईकडून खेळताना खोऱ्याने धावा केल्या आहेत. तसेच देशांतर्गत स्पर्धांमध्येही त्यांनी आपल्या कामगिरीची छाप सोडलीय. त्याने आपल्या कामगिरीने अनेकांना प्रभावित केलंय. 

या खेळाडूची एन्ट्री

टीम मॅनेजमेंटने श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली. त्याजागी श्रेयस अय्यरला संधी मिळाली. श्रेयसने या संधीच दोन्ही हाताने भरभरुन सोनं केलं. श्रेयसने या मालिकेतील 3 सामन्यात नाबाद 3 अर्धशतकं ठोकली. तसेच श्रेयस भारतात अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय ठरला. विशेष म्हणजे श्रेयसने 3 सामन्यांच्या मालिकेत विराटच्या नावावर असलेला सर्वाधिक धावांचा विक्रमही मोडून काढला.