इरफान पठाणच्या पत्नीचा असा लूक आतापर्यंत कधीही तुम्ही पाहिला नसेल, पहिल्यांदाच फोटो Viral

इरफान पठाणच्या पत्नीचा 'तो' फोटो व्हायरल, सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याची एकच चर्चा

Updated: Aug 20, 2022, 02:15 PM IST
इरफान पठाणच्या पत्नीचा असा लूक आतापर्यंत कधीही तुम्ही पाहिला नसेल, पहिल्यांदाच फोटो  Viral title=

Cricket News : भारतीय क्रिकेटमध्ये (Team India) पठाण बंधूंनी (Pathan Brothers) एक काळ गाजवला होता. इरफान पठाण (Irfan Pathan) आणि युसूफ पठाण (Yusuf Pathan) एकेकाळी भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू होते. सध्या या दोघांनीही क्रिकेटला अलविदा केला आहे. पण आजही कोणत्या ना कोणत्या कारणाने पठाण बंधू चर्चेत असतात.

आता पुन्हा एकदा इरफान पठाण चर्चेत आला आहे. पण यावेळी चर्चा होतेय ती त्याच्या पत्नीची. इरफानच्या पत्नीचं नाव सफा बेग (Safa Baig) असून आतापर्यंत तीचे बुरख्यातले फोटो पाहिले असतील. पण आता पहिल्यांदाच सोशल मीडियावर तीचा फोटो समोर आला आहे. इरफान पठाणची पत्नी सौंदर्याच्या बाबतीत एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीला टक्कर देते.

याआधीही एकदा सफा बेगने बुरख्याविना फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले होते, पण त्यावेळी तिला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर आता पुन्हा एकदा सफा बेगचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यात तिचा चेहरा स्पष्ट दिसत असून तिच्या सौंदर्याचं चाहत्यांकडून कौतुक होतंय. 

इरफान पठाणनेही अनेकदा आपल्या पत्नीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, पण कोणत्याच फोटोमध्ये तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. काही फोटोंमध्ये तिने चेहऱ्यावर हात ठेवला आहे तर काही फोटो बुरख्यात आहेत. 

इरफान पठाण नुकताच दुसऱ्यांदा पिता बनला आहे. त्यांनी स्वत: ही गोड बातमी शेअर केली होती, आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव त्याने सुलेमान खान पठाण ठेवलं आहे.