India vs Qatar : भारतीय क्रिकेट टीमने वर्ल्ड फायनल हरल्यानंतर सर्वांच्या नजरा या भारतीय फुटबॉल टीमकडे होत्या. फिफा विश्वचषक 2026 क्वालिफायर सामना मंगळवारी 21 नोव्हेंबरला भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर रंगला. दुसऱ्या फेरीच्या पात्रतेच्या अ गटातील या सामन्यात सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली ब्लू टायगर्सकडून भारतीयांना मोठ्या अपेक्षा होत्या.
A brave fight from the #BlueTigers in Bhubaneswar wasn't enough to get a result against the Asian champions.#INDQAT #FIFAWorldCup #IndianFootball pic.twitter.com/EE3uOVNlKc
— Indian Football Team (@IndianFootball) November 21, 2023
मात्र कतारने भारतीय संघ आणि चाहत्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला. कतारने त्यांच्याच घरच्या मैदानावर भारताचा 3-0 असा पराभव करुन भारतीय फुटबॉल टीमचं विश्चचषक खेळण्याचं स्वप्न जवळपास संपुष्टात आणलं आहे. (Indian football teams dream of playing world cup 2026 qualifiers second round match Chhetri brigade lost 0 3 saff championship 2023)
सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय फुटबॉल संघाने याआधी कुवेतविरुद्ध झालेल्या सामन्यात विजय मिळवल्यामुळे भारतीयांची आशा बळावली होती. मात्र कतारविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला एकही गोल करता आला नाही. ब्लू टायगर्सला खाते न उघडता पराभवाला सामोरे जावं लागलं.
खरं तर मैदानात आल्यानंतरच भारतीय संघाचे खेळी पाहून सुरुवातच ढासळली होती. याचाच फायदा घेत कतारने सामन्याच्या सुरुवातीला म्हणजेच अगदी चौथ्या मिनिटालाच गोल करुन ब्लू टीमवर वरचढ झाली. कतारच्या मुस्तफा मशालने हा गोल केला. यानंतर पहिल्या हाफपर्यंत भारतीय संघाने गोल होऊ दिला नाही. पण जसा दुसऱ्या हाफसाठी संघ मैदानात आला आणि तोच कतारने दुसरा गोल केला. अवघ्या 2 मिनिटांतच हा गोल झाल्यामुळे भारतीय टीमवर प्रेशर वाढलं. त्यानंतर अल्मोज अलीने 47व्या मिनिटाला हा दुसरा गोल करुन भारतीय संघाला अडचणीत आणलं. भारतीय खेळाडूंना एकही गोल करता आला नाही. या संपूर्ण खेळात मैदानात भारतीय संघाला अनेक संधी मिळाल्या पण त्यांना त्याचं सोनं करता आलं नाही.
कतारच्या दुसऱ्या गोलनंतर काहीशी अपेक्षा बाकी होती पण युसूफने 86व्या मिनिटाला तिसरा गोल केला आणि भारतीयांची निराशा झाली. कतारच्या या गोलनंतर भारताच्या विजयाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या. टीम इंडियाला शेवटपर्यंत एकही गोल करता आला नाही.
भारतीय संघाने कुवेतसोबत फिफा विश्वचषकाचा पहिला क्वालिफायर सामना जिंकला होता. ज्यामध्ये ब्लू टायगर्सने 1-0 ने विजय मिळवला होता. या सामन्यात मनवीरने टीम इंडियासाठी एक गोल केला होता.