कोलकाता : आयपीएलच्या २०२० सालच्या मोसमासाठी १९ डिसेंबरला कोलकात्यामध्ये लिलाव होणार आहे. या लिलावासाठी ९७१ खेळाडू मैदानात आहेत. यातले ७१३ खेळाडू भारतीय तर २५८ खेळाडू परदेशी आहेत. ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक ५५ खेळाडूंनी लिलावासाठी नाव नोंदवल आहे. पण सगळ्या ८ टीम मिळून फक्त ७३ जागाच खाली आहेत.
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कने यंदाच्या आयपीएलमधूनही माघार घेतली आहे. तर ग्लेन मॅक्सवेल, क्रिस लीन, पॅट कमिन्स, जॉस हेजलवूड, मिचेल मार्श, डेल स्टेन, एंजलो मॅथ्यूज आणि क्रिस मॉरिस या खेळाडूंची बेस प्राईज २ कोटी एवढी ठेवण्यात आली आहे.
२९ वर्षांच्या स्टार्कने २०१५ साली शेवटची आयपीएलची मॅच बंगळुरूकडून खेळली होती. २०१८ साली कोलकात्याने स्टार्कला ९.४ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं, पण दुखापतीमुळे त्याला स्पर्धेत खेळता आलं नव्हतं. २०१९ सालच्या लिलावाआधी स्टार्क दुखापतीतून सावरत होता, पण वर्ल्ड कपवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्याने आयपीएलमधून माघार घेतली होती.
स्टार्कचं आयपीएल न खेळण्याचं हे लागोपाठ पाचवं वर्ष आहे. २०१६ साली स्टार्क दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. २०१७ सालीही त्याने आपलं नाव मागे गेतलं होतं. २०१८ साली दुखापतीमुळे स्टार्क खेळू शकला नव्हता.
बंगळुरूकडून खेळताना स्टार्कने २७ मॅचमध्ये २०.३८ च्या सरासरीने ३४ विकेट घेतल्या होत्या. २०१४ आणि २०१५ च्या मोसमात स्टार्क सहभागी झाला होता. १५ रनवर ४ विकेट ही स्टार्कची आयपीएलमधली सर्वोत्तम कामगिरी होती.
टीम | रक्कम | खेळाडूंची जागा |
चेन्नई | १४.६० कोटी रुपये | ५ (२ परदेशी) |
दिल्ली | २७.८५ कोटी रुपये | ११ (५ परदेशी) |
पंजाब | ४२.७० कोटी रुपये | ९ (४ परदेशी) |
कोलकाता | ३५.६५ कोटी रुपये | ११ (४ परदेशी) |
मुंबई | १३.०५ कोटी रुपये | ७ (२ परदेशी) |
राजस्थान | २८.९० कोटी रुपये | ११ (४ परदेशी) |
बंगळुरू | २७.९० कोटी रुपये | १२ (६ परदेशी) |
हैदराबाद | १७ कोटी रुपये | ७ (२ परदेशी) |