चेन्नई : मागचे ७ महिने क्रिकेटपासून लांब असलेल्या एमएस धोनीने आयपीएलच्या तयारीला सुरुवात केली आहे. यासाठी धोनीचा चेन्नईमध्ये सराव सुरु झाला आहे. आयपीएलच्या या मोसमाला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या मोसमातही धोनीच चेन्नईचं नेतृत्व करेल. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्याचा धमाका बघण्याची संधी आहे.
एमएस धोनी सध्या चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सरावात व्यग्र आहे. शुक्रवारी नेट प्रॅक्टिस करताना धोनीने पुन्हा एकदा त्याचं जुनं रुप दाखवलं. क्रिकेटपासून लांब असल्यानंतरही धोनीच्या बॅटिंगमध्ये काहीच फरक पडलेला नाही. धोनीने नेटमध्ये लागोपाठ ५ सिक्स मारले.
BALL 1 - SIX
BALL 2 - SIX
BALL 3 - SIX
BALL 4 - SIX
BALL 5 - SIXஐந்து பந்துகளில் ஐந்து சிக்ஸர்களை பறக்கவிட்ட தல தோனி!
முழு காணொளி காணுங்கள்
# "The Super Kings Show"
6 PM
ஸ்டார் ஸ்போர்ட்ஸ் 1 தமிழ்
மார்ச் 8
@ChennaiIPL pic.twitter.com/rIcyoGBfhE— Star Sports Tamil (@StarSportsTamil) March 6, 2020
स्टार स्पोर्ट्स तामीळने धोनीच्या बॅटिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये धोनी मोठे शॉट खेळताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सुरेश रैना आणि अन्य खेळाडू आपल्या बॅटिंगच्या संधीची वाट पाहत आहेत. चेन्नई यंदाच्या आयपीएलची पहिली मॅच मुंबईविरुद्ध खेळणार आहे. या दोन्ही टीममध्ये मागच्यावर्षी आयपीएलची फायनल झाली होती. फायनलमध्ये मुंबईने चेन्नईचा १ रनने रोमांचक पराभव केला होता.
यंदाचं आयपीएल धोनीसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. टी-२० वर्ल्ड कपमध्ये संधी मिळवण्यासाठी धोनीची आयपीएलमधली कामगिरी बघावी लागेल, असं वक्तव्य टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केलं होतं. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्ड कप होणार आहे.