मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 67 व्या सामन्यात मॅथ्यू वेड (Matthew Wade Angry) चांगलाच संतापलेला दिसला. अंपायरने वादग्रस्तरित्या आऊट दिल्यानंतर मॅथ्यू वेडने जे काही केलं ते सोशल मीडियावर व्हायरलं झालंय. फिल्ड अंपायरनंतर थर्ड अंपायरनेही वेडला चुकीच्या पद्धतीने एलबीडबल्यू आऊट दिलं. आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात हा सर्व प्रकार घडला. (ipl 2022 ecb vs gt matthew wade was seen angry in dressing room throw helmet and break bat after controversial umpire decision)
त्यामुळे मॅथ्यू वेडने ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर संताप व्यक्त केला. वेडने ड्रेसिंग रुममध्ये पोहचताच जोरात हेल्मेट फेकला. त्यानंतर त्याने बॅट दोनवेळा जमिनीवर आपटली.
आरसीबीचा ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल सामन्यातील सहावी ओव्हर टाकायला आला. वेडने या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात बॉल वेडच्या पॅडला लागला.
मॅक्सवेलने एलबीडबल्यूसाठी जोरदार अपील केली. अंपायरने त्वरित वेडला एलबीडबल्यू आऊट जाहीर केलं. मात्र वेडला अंपायरचा निर्णय मान्य नव्हता. बॉल ग्लोव्हजला लागल्याचा विश्वास वेडला होता. त्यामुळे वेडने अंपायरच्या आव्हान घेत रिव्हीव्यू घेतला.मात्र या रिव्हीव्यूमध्ये वेडच्या ग्लोव्हजला बॉल लागल्याचं स्पष्ट झालं नाही. वेड स्टंपच्या टप्प्यात सापडल्याने त्याला आऊट देण्यात आलं.
वेडला थर्ड अंपायरने लाल दिव्याद्वारे आऊट असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे वेड हताश आणि संतापलेला दिसला. वेड नकारात्मक पद्धतीने मान हळवत ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघाला.
यावेळेस आरसीबीचा विराट कोहली वेडच्या जवळ गेला. विराटने वेडसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. वेडने मैदानातून बाहेर जाताना ओरडला. यानंतर वेडने जे काही केलं, ते सर्व सोशल मीडियावर व्हायरल झालं.
वेडने ड्रेसिंग रुममध्ये पोहचताच हेल्मेट वेगात फेकून दिला. तसेच 2 वेळा बॅट जमिनीवर आपटली. वेडच्या या ड्रेसिंग रुममधील संतापलेला अवताराचा व्हीडिओ सोशल माीडियावर व्हायरल झाला.
Angry Matthew Wade..
Tod fod diya BAT ko#RCBvGT pic.twitter.com/MBeLg5vDSr
— KATTAR VIRAT BHAKT TIGER (@AbinashTiwari_1) May 19, 2022