मुंबई : टीम इंडियासाठी (Team India) आणि आयपीएलमध्ये (IPL) यशस्वी टीमसाठी वाईट बातमी आहे. स्टार बॉलरला दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून बाहेर रहावं लागणार आहे. तसेच दुखापतीमुळे आयपीएलच्या 15 व्या मोसमातही खेळता येणार नाही. तसेच या खेळाडूचं ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणंही अवघड होऊन बसलंय. (ipl 2022 team india and csk star bolwer deepak chahar might be ruled out 4 months in cricket)
टीम इंडियाचा आणि आयपीएलमध्ये चेन्नईकडून (CSK) खेळणाऱ्या दीपक चाहरला (Deepak Chahar) दुखापतीमुळे 15 व्या मोसमाला मुकावं लागलं आहे. तसेच आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये दीपकला खेळता येणार की नाही, याबाबतही भिती व्यक्त केली जात आहे.
दीपकला पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या 15 व्या मोसमात आणि टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळता येणार नाही, असं वृत्त टीओआयने दिलं आहे. दीपकचं गोटात नसणं हे चेन्नई आणि टीम इंडियासाठी चिंताजनक आहे. जर दीपक टी 20 वर्ल्ड कपपर्यंत दुखापतीतून सावरला नाही, तर तो टीम इंडियासाठी मोठा झटका असेल.
दीपकला फेब्रुवारी महिन्यात वेस्टइंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात दुखापत झाली होती. दीपकच्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली होती. यानंतर तो बंगळुरुतील एनसीएमध्ये दुखापतीतून सावरण्यासाठी गेला. मात्र आता आधीच्या दुखापतीने डोकं वर काढलं. दीपकला बॅक इंज्युरीमुळे किमान 4 महिने तरी क्रिकेट खेळता येणार नाही.