IPL 2024 Auction News : इंडियन प्रीमियर लीगच्या 2024 हंगामातील खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये (IPL Auction in Dubai) होणार आहे, ज्यामध्ये खेळाडूंना कायम ठेवण्याची घोषणा करण्यासाठी संघांकडे 26 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. तर बीसीसीआयने (BCCI) फ्रेंचायजींना त्यांचे रिलीज आणि रिटेन खेळाडू कोण कोण असतील याची यादी 15 नोव्हेंबरपर्यंत जमा करण्यास सांगितलंय. त्यामुळे आता ऑक्शनच्या हालचालींना वेग आल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता ऑक्शनच्या (IPL 2024 Auction) आधी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) बाजी मारल्याचं पहायला मिळतंय. एमआयने एका धाकड ऑलराऊंडरची संघात एन्ट्री केली आहे.
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएलचा लिलाव हा विदेशात देखील होण्याची शक्यता आहे. हा लिलाव 19 डिसेंबरला दुबईत होण्याची शक्यता आहे. अशातच मुंबई इंडियन्स संघाने लखनऊ सुपर जायंट्सच्या ट्रेडच्या माध्यमातून रोमॅरियो शेफर्डला आपल्या संघात सामील करून घेतलंय.
NEWS
Romario Shepherd traded to Mumbai Indians from Lucknow Super Giants.
Details #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) November 3, 2023
रोमॅरियो शेफर्ड याने आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त 4 सामने खेळले आहेत. लखनऊ सुपर जायंट्ससाठी त्याने फक्त 1 सामना खेळला आहे. त्यातही तो पहिल्याच बॉलवर आऊट झाला होता. 2022 च्या आयपीएलमध्ये हैदराबाद संघाने (SRH) वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू शेफर्डला 7.75 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. मात्र, त्याला तीन सामन्यात 58 धावा करता आल्या. तर त्याने तीन सामन्यात तीन विकेट्स देखील घेतल्या आहेत.
मुंबई इंडियन्स - 50 लाख रूपये
गुजरात टायटन्स - 4.45 कोटी रूपये
लखनऊ सुपर जायंट्स - 3.55 कोटी रूपये
रॉयल चॅलेंजर बेंगलोर - 1.75 कोटी रूपये
चेन्नई सुपर किंग्ज - 1.5 कोटी रूपये
पंजाब किंग्ज - 12.20 कोटी रूपये
सनराईजर्स हैदराबाद - 6.55 कोटी रूपये
दिल्ली कॅपिटल्स - 4.45 कोटी रूपये
राजस्थान रॉयल्स - 3.35 कोटी रूपये
कोलकाता नाईट राडयर्स - 1.65 कोटी रूपये