IPL 2024 KKR Playing XI: आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा पहिला सामना सनरायजर्स हैदराबादविरोधात होणार आहे. 23 मार्चला कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये हा सामना खेळला जाणार आहे. गौतम गंभीर संघाचा मेंटॉर म्हणून दाखल झाला असल्याने कोलकाता संघाच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. पण दुसरीकडे कर्णधार श्रेयस अय्यर जखमी असल्याने कोलकाता संघापुढे अडचण आहे. जर श्रेयस अय्यर खेळला नाही तर त्याच्या अनुपस्थितीत कोणत्या खेळाडूला संधी दिली जाईल, तसंच प्लेइंग 11 कशी असेल याबद्दल जाणून घ्या.
कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर रणजीदरम्यान जखमी झाला असून अद्याप पूर्णपणे दुखापतीमधून सावरलेला नाही. मुंबई आणि विदर्भ संघात झालेल्या अंतिम सामन्यात श्रेयस अय्यर खेळला होता. पण दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली होती. पण मुंबई संघ जिंकल्यानंतर तो मैदानात सेलिब्रेशन करताना दिसला होता. तसंच दुखापतीमुळे इंग्लंडविरोधातील मालिकेतही त्याला विश्रांती देण्यात आली होती.
दुखापतीमुळे श्रेयस अय्यर आयपीएलसाठी उपलब्ध असेल की नाही हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पण नुकतंच झालेल्या कर्णधारांच्या फोटोशूटला श्रेयस अय्यर हजर होता. पपण जर श्रेयस अय्यर खेळला नाही तर उपकर्णधार नितीश राणाच्या खांद्यावर तात्पुरत्या स्वरुपासाठी कर्णधाराची जबाबदारी दिली जाऊ शकते.
श्रेयस अय्यरसाठी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणं फार महत्त्वाचं आहे. याचं कारण बीसीसीयआने त्याला वार्षिक करारातून वगळलं आहे. त्यामुळे भारतीय संघात आपलं स्थान निश्चित करण्यासाठी त्याला चांगली कामगिरी करण्याशिवाय पर्याय नाही. आधीच कसोटीमध्ये चांगली कामगिरी करत नसल्याने श्रेयस अय्यरवर टीका होत आहे. त्यात जर आयपीएलमध्येही तो अपयशी ठरला तर टी-20 संघातील स्थानही गमावू शकतो.
कोलकाता संघाकडे फील, गुरबाज, वेंकटेश अय्यर, असे अनेक स्फोटक फलंदाज आहेत. जे संघाला दमदार सुरुवात करुन देत मोठी धावसंख्या उभारण्यात मदत करु शकतात. तसंच श्रेयस अय्यर, नितीश राणा, रिंकू यासारखे अनुभवी खेळाडू आहेत.
याशिवाय फिरकी गोलंदाजी त्यांच्यासाठी ट्रम्प कार्ड म्हणून काम करेल. मुजीब उर रहमान, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मासारखे गोलंदाज त्यांच्य ताफ्यात आहेत.
मिचेल स्टार्कसारखा गोलंदाज संघात असताना कोलकाताला त्याला साथ देणाऱ्या गोलंदाजाची कमतरता जाणवू शकते. तरुण गोलंदाज चेतन, हर्षित आण वैभव अरोरा यासारखे तरुण गोलंदाज संघात असून त्यांच्या कामगिरीवर लक्ष असेल. याशिवाय आंद्रे रसेल फॉर्ममध्ये नसणंही कोलकाताला महाग पडू शकतं.
एकीकडे श्रेयस अय्यरची दुखापत तर दुसरीकडे महत्तवाचे खेळाडू फॉर्ममध्ये नसणं कोलकातासाठी चिंतेची बाब आहे. श्रेयस अय्यर, सुनील नरेन आणि रसेल हे जर झगडत राहिले तर यामुळे कोलकाताची फलंदाजी आणि गोलंदाजी प्रभावी होऊ शकणार नाही.
सनरायजर्स हैदराबादविरोधातील Playing 11 कशी असेल?
कोलकाता संघ इतर खेळाडूंसह श्रेयस अय्यरवर फार अवलंबून असेल. पण जर श्रेयस अय्यर पहिल्या सामन्यात उपलब्ध नसला तर त्याच्या जागी मनिष पांडेला संधी दिली जाऊ शकते.
तसंच संघ राहुल्ला गुरबाज आणि सुयश शर्मा यांच्याकडे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पाहत आहे.
फिल सॉल्ट, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती,
इम्पॅक्ट प्लेअर: सुयश शर्मा/ रहमानउल्ला गुरबाज
पहिला सामना - 23 मार्च - सनरायजर्स हैद्राबाद
दुसरा सामना - 23 मार्च - कोलकाता नाईट रायडर्स
तिसरा सामना - 3 एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स