मुंबई: बऱ्याचदा आपल्याकडे साधारण लग्न झालं की पहिला प्रश्न हाच असतो अरेंज केलं की लव्ह? त्यात साधारण क्रिकेट आणि बॉलिवूड किंवा हॉलिवूडचं नातं अगदी जवळचं मानलं जातं. भारतीय संघातील बऱ्याच खेळाडूंनी लव्ह मॅरेज केलं आहे.
यंदाच्या IPL 2021च्या चौदाव्या हंगामात विराट कोहलीच्या टीमने धमाकेदार सुरुवात केली. मात्र कोरोनामुळे IPLला थोडा ब्रेक लागला असला सामने स्थगित झाले असले तरी संघातील खेळाडू मात्र कोणत्यातरी कारणामुळे चर्चेत आहेतच. सध्या एबी डिव्हिलियर्स एका खास गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.
एबी डिव्हिलियर्सच्या पत्नीला चाहत्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला होता. तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? त्यावर डेव्हिलियर्सच्या पत्नीनं खास इन्स्टावर पोस्ट करून उत्तर दिलं आहे. हे उत्तर वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
'आमचं लग्न लव्ह मॅरेज आहे. एबी डिव्हिलियर्सनं मला आग्रा इथल्या ताज महालासमोर मला प्रपोज केलं होतं. त्यानंतर आम्ही लग्न केलं', अशी पोस्ट एबी डिव्हिलियर्सच्या पत्नीने इन्स्टावर लिहिली आहे.
यंदाच्या IPL2021 सामन्यांमध्ये एबी डिव्हिलियर्सची कामगिरी खूपच जबरदस्त राहिली आहे. त्याने 27 चेंडूमध्ये 48 धाला केल्या होत्या त्यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले होते. 7 सामन्यांमध्ये त्याने 207 धावा केल्या आहेत. 7 सामन्यांमध्ये त्याने 16 चौकार आणि 10 षटकार ठोकले आहेत. IPLमध्ये कोरोना घुसल्यामुळे सध्या 31 सामने स्थगित करण्यात आले आहेत.