Jasprit Bumrah On Hardik Pandya : रोहित शर्मा याच्याकडून मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी काढून घेतल्यानंतर फँचायझीने हार्दिक पांड्याच्या खांद्यावर संघाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, पलटणच्या फॅन्सला मुंबई इंडियन्सचा हा निर्णय पटला नाही. वानखेडे स्टेडियवर नव्हे तर इतर ठिकाणी देखील हार्दिक पांड्याला प्रेक्षकांनी ट्रोल केलं. याचा परिणाम असा झाला की, मुंबई इंडियन्सला प्लेऑफ देखील गाठता आली नाही. अशातच आता याच मुद्द्यावर जसप्रीत बुमराहने आपलं मत व्यक्त केलं आहे.
समजू शकतो की, आपण भावनिक देशात राहतो, इथं खेळाडू आणि चाहते देखील खेळाप्रती भावूक असतात. जर तुम्ही भारतीय खेळाडू असाल तर तुमच्यावर याचा नक्की परिणाम होतो. तुम्ही भारतात खेळताय आणि तुमचे स्वत:चे फॅन्स तुमच्याबद्दल असं बोलतात. स्वतःचे चाहते तुमच्याबद्दल बोलत असतील तर स्वतःवर लक्ष केंद्रित करणं सुरू करा. असे दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न करा, असंही जसप्रीत बुमराह म्हणाला आहे.
टी-ट्वेंटी मालिकेसाठी हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी दिली नाही अन् व्हाईस कॅप्टन्सी देखील दिली गेली नाही. तर वनडे मालिकेत देखील हार्दिक पांड्याला डच्चू मिळालाय. तर दुसरीकडे हार्दिक पांड्याला खासगी आयुष्यात देखील मोठ्या संकटाला सामोरं जावा लागत आहे. पत्नीसोबत हार्दिकने घटस्फोट जाहीर केला. त्यामुळे आता हार्दिक दोन्ही बाजूने कचाट्यात सापडला आहे.
दरम्यान, वर्ल्ड कप जिंकून आल्यावर टीम इंडियाचे खेळाडू पहिल्यांदाच श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पुन्हा संघात बोलवलं असलं तरी दुसरीकडे जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आली आहे. वर्क लोड मॅनेजमेंटमुळे बुमराहला आराम देण्यात आल्याचं सांगितलं गेलंय. त्यामुळे आता बुमराह थेट टेस्ट मालिकेत उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे.