Karnataka vs Tamilnadu : गेल्या दशकापासून क्रिकेटची क्रेझ देशभरात वाढत असल्याने नव्या टॅलेंटला संधी मिळत असल्याचं पहायला मिळतंय. रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2024) असो वा आयपीएल नवनवीन युवा खेळाडूंनी आपलं प्रभुत्व सिद्ध केलं आहे. अशातच आता नवे खेळाडू टीम इंडियाचा दरवाजा खटखावत असताना आता नेमकी संधी कोणाला द्यावी? असा सवाल विचारला जातोय. अशातच आता किंग कोहलीच्या चेल्याने रणजी ट्रॉफीमध्ये शतक ठोकत पुन्हा एकदा सिलेक्टर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
भारतात रणजी ट्रॉफीचे सामने खेळवले जात आहेत. एलिट गटात कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात आरसीबीचा तालमीत तयार झालेल्या आणि लखनऊ सुपर जायएन्ट्सचा युवा फलंदाज देवदत्त पेडिकल (Devdutt Padikkal) याने रणजी सामन्यात खणखणीत शतक ठोकलं आहे. त्यामुळे आता केएल राहुल (KL Rahul) दुखापतग्रस्त झाल्याने पेडिकलला संधी मिळण्याची शक्यता आहे. पेडिकलने 218 बॉलमध्ये 151 धावांची खेळी केली. त्यात त्याने 8 सिक्स अन् 12 फोर खेचले. त्याच्या या खेळीच्या जोरावर कर्नाटकला 366 धावांची आघाडी मिळवता आली होती.
चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवालने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्नाटकाने पहिल्या डावात 366 धावांची खेळी केली. त्याला प्रत्युत्तर देताना तमिळनाडूचा डाव 151 धावांवर आटोपला. मात्र, कर्नाटकाला दुसरा डाव अवघड गेला. दुसरा डाव 139 धावांवर गारद झाल्याने तमिलनाडूकडे विजयाची संधी होती. मात्र, पाचव्या दिवसाच्या अखेरपर्यंत तमिलनाडूला विजयाचा आकडा गाठता आला नाही.
कर्नाटक (प्लेइंग इलेव्हन): रविकुमार समर्थ, मयंक अग्रवाल (C), देवदत्त पडिक्कल, निकिन जोस, मनीष पांडे, श्रीनिवास शरथ (WK), हार्दिक राज, किशन बेदारे, शशी कुमार के, विजयकुमार विशक, विद्वत कवेरप्पा.
तामिळनाडू (प्लेइंग इलेव्हन): सुरेश लोकेश्वर, एन जगदीसन (WK), प्रदोष पॉल, बाबा इंद्रजीथ, विजय शंकर, विमल खुमर, बूपथी कुमार, रविश्रीनिवासन साई किशोर (C), एस अजित राम, एम मोहम्मद, संदीप वॉरियर.