मुंबई : दरवर्षी आयपीएलमध्ये अशा काही गोष्टी घडतात जे लोकं बऱ्याच काळासाठी उचलून धरतात. त्याला बर्याच काळासाठी आठवतात आणि त्यावर सोशल मीडियावर वेगवेगळे मिम्स देखील शेअर करतात. आयपीएल 2021 च्या केकेआर आणि हैदराबादच्या सामन्यांत अशीच एक घटना घडली आहे. कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 2021 दरम्यान एका 'मिस्ट्री गर्ल'मुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. केशरी ड्रेसमध्ये दिसलेल्या या 'मिस्ट्री गर्ल'ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ज्यानंतर या मिस्ट्री गर्लचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेला फोटो, ज्यामध्ये एक मुलगी सनरायझर्स हैदराबादला चीअर करताना दिसत आहे. आता हाच प्रश्न तुमच्या मनात येत असणार की ही मुलगी कोण आहे? काव्या मारन (Kaviya Maran) असे या मिस्ट्री गर्लचे नाव आहे आणि ती सनरायझर्स हैदराबादची सीईओ आहे. स्टेडियममध्ये आपल्या संघाला पाहात आनंद घेणाऱ्या काव्याची, स्टेडियमवर हजर राहण्याची ही पहिलीच वेळ नाही.
आयपीएलचा लिलाव सुरू असतानाही काव्या सनरायझर्स हैदराबादसाठी बोली लावताना दिसला. काव्या पहिल्यांदा 2018 मध्ये आयपीएलमध्ये दिसली होती. काव्या मारनच्या वडिलांचे नाव कलानिथी मारन (Kalanithi Maran) आहे, जे भारताचे एक प्रसिद्ध बिझनेसमॅन आहेत. काव्या एमबीए आहे आणि ती आता 28 वर्षांची आहे.
माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारनहे काव्याचे काका आहेत, तर तिचे वडील सन ग्रुप कंपनीचे मालक आहेत. सामन्या दरम्यान प्रेक्षकांनी पाहिले की, केकेआरचा सलामीवीर शुभमन गिल याला राशिद खानने बाद केले तेव्हा काव्याने आनंदाने उडी घेतली. काव्या मारनचे फोटो आणि व्हीडिओंना सोशल मीडियावर चांगलेच पसंती मिळत आहेत. यामुळेच सोशल मीडिया यूझर्सना काव्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता आहे.