नवी दिल्ली : टी-२० क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटर्स आहेत जे आपल्या धडाकेबाज बॅटिंगने विरोधी टीम्सला घाम फोडतात. मात्र, असेही काही बॅट्समन आहेत जे सिक्सर लगावत रेकॉर्ड्सवर रेकॉर्ड करत आहेत. केरॉन पोलार्ड त्यापैकी एक बॅट्समन आहे.
केरॉन पोलार्ड याने टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या करिअरमधील ५०० वा सिक्सर लगावला आहे. असा कारनामा करणारा दो जगातील दुसरा बॅट्समन बनला आहे.
सध्या बांगलादेशमध्ये (BPL)बांगलादेश प्रिममियर लीग सुरु आहे. यामधील एका मॅचमध्ये शनिवारी पोलार्डने धडाकेबाज इनिंग खेळत आपल्यान नावावर हा ५०० सिक्सरचा रेकॉर्ड केला आङे. BPL मध्ये ढाका डायनामाईट्सच्या टीम कडून खेळताना पोलार्डने राजशाही किंग्ज विरोधात ५२ रन्सची इनिंग खेळली. हे ५२ रन्स पोलार्डने २४ बोल्समध्ये केले.
आपल्या या धडाकेबाज इनिंगमध्ये पोलार्डने ३ सिक्सर लगावले. यासोबतच त्याने क्रिकेटच्या टी-२० फॉरमॅटमध्ये ५०० सिक्सरच्या आकड्याला गवसणी घातली आहे.
पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे तर त्याच्यापूर्वी क्रमांक एकवर आहे ख्रिस गेल. गेलने ३१० मॅचेसमध्ये ७७२ सिक्सर लगावले आहेत. तर पोलार्डने ३९२ मॅचेसमध्ये ५०० सिक्सर लगावले आहेत.
केरॉन पोलार्ड नंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे न्यूझीलंडचा बॅट्समन ब्रँडन मॅक्युलम याचा. त्याने २९८ मॅचेसमध्ये ४०० सिक्सर लगावले आहेत. तर, चौथ्या क्रमांकावर आहे ड्वेन स्मिथ. स्मिथने ३४७ लगावले आहेत.