टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या मॅचपूर्वी स्टार फलंदाजाला दुखापत

IND vs AUS 1st Test:  पर्थमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया  सीरिजची पहिली टेस्ट खेळवली जाणार असून या सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. 

पुजा पवार | Updated: Nov 15, 2024, 12:02 PM IST
टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या मॅचपूर्वी स्टार फलंदाजाला दुखापत  title=
(Photo Credit : Social Media)

IND vs AUS 1st Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) सीरिजला 22 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. पर्थमध्ये या  सीरिजची पहिली टेस्ट खेळवली जाणार असून या सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या एका स्टार फलंदाजाला दुखापत झाली असून ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या पर्थ टेस्टमध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत तो ओपनिंग फलंदाज म्हणून खेळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता त्यालाच दुखापत झाल्याने टीम इंडियाचं टेंशन वाढलंय. 

टीम इंडियासाठी वाईट बातमी : 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा वैयक्तिक कारणांमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या टेस्टमध्ये खेळणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पर्थ टेस्टमध्ये टीम इंडियाचा स्टार विकटकीपर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) हा सलामी फलंदाज म्हणून उतरू शकत होता. मात्र याच दरम्यान एक वाईट बातमी समोर आली असून केएल राहुल पर्थमध्ये 15 नोव्हेंबर रोजी सकाळी WACA मैदानावर तीन दिवसीय वार्मअप सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला.  पर्थमध्ये WACA मैदानावर भारत आणि भारत-A यांच्यात तीन दिवसीय वार्मअप सामना खेळवला जात आहे. यावेळी खेळताना एक बॉल बाउंस होऊन राहुलच्या उजव्या एल्बोवर जाऊन लागला. बॉल लागल्यावर राहुल वेदनेने कळवळला. वेदनेमुळे राहुल फलंदाजी सुरु ठेऊ शकला नाही ज्यामुळे तो मैदान सोडून बाहेर पडला. 

टीम इंडियाला मोठा झटका : 

केएल राहुलला दुखापत झाल्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा झटका आहे. कारण रोहित शर्माची रिप्लेसमेंट म्हणून राहुलकडे पाहिले जात होते. तसेच राहुलचा फॉर्म सुद्धा चिंतेचा विषय आहे. राहुलने शेवटच्या ५ टेस्टमध्ये 16, 22*, 68, 0 आणि 12 अशा धावा केल्या होत्या.  केएल राहुलने भारताकडून एकूण  53 टेस्ट सामन्यात 91 इनिंगमध्ये 2981 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 8 शतक आणि 15 अर्धशतक ठोकली आहते. यात राहुलचा सर्वाधिक स्कोअर हा 199 धावा असा आहे. 

टीम इंडियाकडे कोणता ऑप्शन? 

पर्थ टेस्टमध्ये रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोघेही खेळू शकले नाहीत तर त्याऐवजी ध्रुव जुरेलसारख्या युवा फलंदाजाला टीम इंडियासाठी ओपन करण्याची संधी मिळू शकते. केएल राहुलपेक्षा ध्रुव जुरेलची फलंदाजी सध्या चांगली असून तो  तांत्रिकदृष्ट्या अतिशय मजबूत फलंदाज आहे. त्यामुळे ओपनिंग बॅट्समन म्हणून रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेल हा चांगला ऑप्शन ठरू शकतो. 

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ : 

रोहित शर्मा (कर्णधार ), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर.