IPL 2023: इंडियन प्रिमीयर लीगच्या (Indian Premier League) 16 सिझन रोमांचक होताना दिसतोय. बुधवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्सने (Lucknow Super Giants) राजस्थान रॉयल्सवर 10 रन्सने मात केली. या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने धीम्या गतीने फलंदाजी केली नाही. अधिक स्कोर न उभारताही लखनऊचा विजय झाला खरा मात्र, कर्णधार केएल राहुलला (KL Rahul) एक गोष्ट भोवली आहे.
राजस्थान रॉयल्स विरूद्धचा सामना जिंकून देखील 12 लाखांचा दंड बसला आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार के.एल. राहुलला दंड ठोठावण्यात आला असून टीमच्या स्लो ओव्हर रेटमुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. निर्धारित वेळेत ओव्हर्स न फेकल्यामुळे आता केएल राहुलला हा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे केएल राहुलला हा एक मोठा झटका मानला जातोय.
यासंदर्भात आयपीएलने एक निवेदन जारी केलं आहे. आयपीएलने या निवेदनात म्हटलंय की, जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 26 व्या सामन्यात आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल राहुलला दोषी ठरवण्यात आलं आहे. स्लो ओव्हर रेटचा हा पहिलाच गुन्हा असल्याने राहुलला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.
स्लो ओव्हर रेटमुळे दंड भरणारा केएल राहुल एकटा कर्णधार नाहीये. यापूर्वी आयपीएल टीमच्या कर्णधारांवर स्लो ओवर रेटमुळे दंड ठोठवण्यात आला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार सूर्यकुमार यादव, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आणि आरसीबीचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिस यांच्यावर देखील 12 लाखांचा दंड लागला होता.
गेल्या अनेक दिवसांपासून लखनऊचा कर्णधार केएल राहुलला ट्रोल केलं जातंय. याचं कारण म्हणजे, गेल्या काही सामन्यात त्याने केलेली संथ फलंदाजी. याची प्रचिती राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात देखील पहायला मिळाली. या सामन्यात राहुलने 32 बॉल्समध्ये 39 रन्सची खेळी केली. यामध्ये त्याने 4 चौके आणि 1 सिक्स लगावले. त्यामुळे सोशल मीडियावर त्याला त्याच्या या धीम्या खेळीमुळे ट्रोल करण्यात आलंय.
राहुलच्या या खेळीनंतर इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनने राहुलची बॅटिंग बघण्यासाठी बोअरिंग असल्याचं म्हटलंय. केएल राहुलला पॉवर प्लेमध्ये फलंदाजी करताना बघणं, हे मी आतापर्यंतच सर्वात बोअरिंग काम केल्याचं पीटरसनने म्हटलं आहे.