हारारे : भारतीय फॅन्समध्ये क्रिकेटची क्रेझ पाहण्यासारखी आहे, जगात कुठेही टीम इंडिया खेळत असली तरी चाहते तिथे पोहोचतात. सध्या टीम इंडिया झिम्बाब्वेच्या हरारेमध्ये एकदिवसीय सिरीज खेळतेय. जेव्हा टीम इंडिया पहिल्या वनडे सामन्यापूर्वी सराव करत होती, तेव्हा एक चाहता टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलला भेटायला आला.
याठिकाणी एका चाहत्याने सर्व खेळाडूंसोबत फोटो क्लिक केला. यावेळी कर्णधार केएल राहुलने त्या चाहत्याला मॅच पाहण्यासाठी शाळेला दांडी न मारण्याचा सल्ला दिला. मात्र यावेळी मुलाने असं उत्तर दिलं की एकच हशा पिकला.
ही संपूर्ण घटना टीम इंडियाच्या सराव सत्रादरम्यान घडली. जेव्हा एक शाळकरी मुलगा सामना पाहण्यासाठी पोहोचला. या मुलाने केएल राहुल, इशान किशनसोबत फोटोही क्लिक केला.
यादरम्यान केएल राहुलने त्याला विचारलं की, तो सामना पाहायला येणार आहे. ज्याला मुलाने उत्तर दिलं, 'शाळेला खड्ड्यात जाऊदे, मी सामना पाहण्यासाठी येणार आहे'
यानंतर कर्णधार केएल राहुलने त्या शाळकरी मुलाला समजावलं. म्हणाला की अरे, मॅचसाठी शाळा बंक करू नका. त्यावर मुलाने सांगितले की उद्या शाळेत काही विशेष नाही, असो, म्हणून तो येऊ शकतो.
टीम इंडिया तब्बल 6 वर्षांनंतर झिम्बाब्वेमध्ये पोहोचली आहे. टीम इंडिया अनेकदा मोठ्या देशांसोबत खेळते, अशा पद्धतीने टीम इंडियाची बी टीम तिथे पोहोचली आहे.