KS Bharat first Career stumping :बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) नागपूर टेस्टमधील पहिल्या सामन्याचा पहिला दिवस टीम इंडियाच्या नावे राहिला आहे. कारण सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने गोलंदाजी आणि फलंदाजीत कमाल करून दाखवली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा मिस्टर 360 सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)आणि विकेटकिपर केएस भरतने (KS Bharat) डेब्यू केला होता. या डेब्यू सामन्यात भरतने कमाल करून दाखवली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतलेल्या पहिल्या स्टम्पिंगची चर्चा रगंली आहे. या स्टम्पिंगचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यात डेब्यू करणाऱ्या केएस भरतने (KS Bharat)करिअरमधली पहिली स्टंम्पिंग घेतली आहे. मार्नस लाबूशेनला त्याने स्टंम्प आऊट केले. रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) टाकलेला ब़ॉल लाबूशेन थोड्या अंतरावर पुढे येऊन मारला.मात्र तो त्याच्याकडून मीस झाला आणि केएस भरतच्या हातात गेला. यावेळी क्षणाचाही विलंब न लावता त्याने त्याला स्टंम्प आऊट केले. अशाप्रकारे त्याने करिअरमधली पहिली स्टम्पिंग घेतली.
भरतने (KS Bharat) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करिअरची पहिली स्टंम्पिंग घेताच त्याची धोनीशी तुलना होऊ लागली आहे.खरं तर भरतने ही पहिली स्टम्पिंग चित्याच्या वेगाने घेतली, ते पाहून लाबूशेनसह क्रिकेट फॅन्स अवाक झाले होते. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) टाकलेला बॉल मारताना लाबूशेनचा पाय क्रिज सोडून थोडासाच बाहेर आला होता. परंतु केएस भरतने (KS Bharat) त्या संधीचा फायदा घेत चित्याच्या वेगाने स्टंम्पिंग केली. त्याची ही वेगाने घेतलेली स्टम्पिंग पाहून क्रिकेट फॅन्सने त्याची तुलना धोनीशी करायला सुरू केली आहे.
KS Bharat
Wicket no 3#BorderGavaskarTrophy #kholi#smith pic.twitter.com/PxpiOgzRIh— Days since kohli hundred (@viratkafann) February 9, 2023
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा एकही खेळाडू टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीसमोर क्रिजवर टीकत नव्हता. त्यातल्या त्यात लाबूशेन कसाबसा अर्धशतक झळकावू शकेल इथपर्यंत पोहोचला होता. मात्र भरतने (KS Bharat) त्याची स्टम्पिंग घेताच त्याचे अर्धशतक हुकले. लाबूशेन 49 धावा करून बाद झाला.
दरम्यान नागपूर टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ ढेपाळला. ऑस्ट्रेलियाचा संघ 177 धावावर ऑल आऊट झाला. ऑस्ट्रेलियाच्या एकाही खेळाडूला अर्धशतक ठोकता आले नाही. त्यानंतर मैदानात फलंदाजीस उतरलेल्या टीम इंडियाने पहिला दिवस संपेपर्यंत 1 विकेट गमावून 77 धावा ठोकल्या होत्या. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियापासून 100 धावा दुर आहे. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्माने नाबाद अर्धशतक ठोकले आहे, तर आश्विनने अद्याप खाते उघडले नाही आहे. आता दुसऱ्या दिवशी टीम इंडिया पहिल्या डावात किती धावांचा डोंगर उभारते हे पाहावे लागेल.