मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगमातील 10 वा सामना गुजरात विरुद्ध दिल्ली झाला. या सामन्यात दिल्ली टीमचा 14 धावांनी पराभव करण्यात गुजरातला यश मिळालं. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वामध्ये हा दुसरा विजय गुजरातला मिळाला. दिल्लीच्या हातातोंडाचा घास काढून घेण्यात गुजरात दुसऱ्यांदा यशस्वी ठरला.
ऋषभ पंत या सामन्यात अंपायरशी भिडला. दिल्लीने पहिल्यांचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. या मॅचमध्ये एक घटना अशी घडली की ज्यामुळे सगळ्यांचं लक्ष हार जीत सोडून त्याकडे गेलं.
का भिडला पंत?
गुजरात टीमने पहिल्यांदा फलंदाजी करत 172 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करत दिल्लीकडून कर्णधार पंत आणि ललित यादव फलंदाजीसाठी उतरले. 12 व्या ओव्हरमध्ये विजय शंकरच्या चौथ्या बॉलवर एक धक्कादायक घटना घडली.
पंतने लेग साइड शॉट खेळला. त्यानंतर ललित आणि पंत धावा काढण्यासाठी पळाले. त्याचवेळी ललित यादवकडे अभिनव मनोहरने बॉल फेकला. विजय शंकरने ललितला रनआऊट केलं. या रनआऊटवरून मैदानात मोठा वाद झाला.
— Sam (@sam1998011) April 2, 2022
विजय शंकरजवळ जेव्हा रनआऊट करण्यासाठी बॉल आला तेव्हा एक बेल्स त्याच्या पायामुळे खाली पडली. तर दुसरी त्याने रनआऊट केल्याने पडली. विजय शंकरच्या पायामुळे बेल्स पडल्याचा दावा सामन्यात करण्यात आला. असं असतानाही फलंदाजाला आऊट देण्यात आलं. या रनआऊटवरून मोठा वाद निर्माण झाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अंपायरने तिथे पंतला नियम समजवला अखेर दिल्लीला नमतं घ्यावं लागलं. ललित यादवला तंबुमध्ये परतण्याची वेळ आली. कर्णधार ऋषभ पंतने 29 बॉलमध्ये 43 धावा केल्या. तर ललितने 25 धावा केल्या. दिल्लीचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या करू शकला नाही.
लखनऊ टीमच्या हातून विजय खेचून आणल्यानंतर गुजरातने दिल्लीला पराभूत केलं. कर्णधार हार्दिक पांड्याला सलग दुसरा विजय मिळवण्यात यश आलं आहे. लॉकी फर्ग्युसन सामन्याचा खरा हिरो ठरला. त्याने 28 रन देऊन 4 विकेट्स घेतल्या.