IND vs BAN LIVE Score: भारताचा बांगलादेशवर दमदार विजय, आता पुढचा सामना पाकिस्तानशी

IND vs BAN Live Score Updates in Marathi: भारत 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध सामन्यासह टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात करेल. या सामन्याचे क्षणोक्षणीचे अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.   

IND vs BAN LIVE Score: भारताचा बांगलादेशवर दमदार विजय, आता पुढचा सामना पाकिस्तानशी

Champion Trophy 2025, India vs Bangladesh LIVE Scorecard and Updates: भारत 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध सामन्यासह टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मोहिमेला सुरुवात करेल. या सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या. 

 

20 Feb 2025, 21:52 वाजता

चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारताने विजयी सलामी दिली आहे. भारतीय संघाने बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केला आहे. 

 

20 Feb 2025, 20:58 वाजता

भारताने गमावल्या 4 विकेट्स; विराट, श्रेयस पाठोपाठ अक्षर पटेलही माघारी  

भारताने 144 धावांवर चार विकेट्स गमावल्या आहेत. यापूर्वी बांगलादेशच्या गोलंदाजांना रोहित, विराट आणि श्रेयस अय्यरची विकेट घेण्यात यश आले होते. आता 31 व्या ओव्हरला अक्षर पटेलची सुद्धा विकेट गेली आहे. अक्षर पटेलने 12 बॉलमध्ये 8 धावा केल्या आहेत. 

20 Feb 2025, 20:22 वाजता

शुभमन गिलने पूर्ण केलं अर्धशतक, भारताला विजयासाठी फक्त 100 धावा दूर 

भारताचा उपकर्णधार शुभमन गिल याने मैदानात टिकून फलंदाजी करून अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्याने 69 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं असून या दरम्यान 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. 

20 Feb 2025, 20:13 वाजता

भारताला मोठा धक्का, 22 धावा करून विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये 

भारताचा फलंदाज विराट कोहलीच्या रूपाने टीम इंडियाला दुसरा धक्का बसला असून बांगलादेशला दोन विकेट घेण्यात यश आले आहे. विराट कोहली 38 बॉलवर २२ धावा करून बाद झाला. यावेळी त्याने 1 चौकार लगावला. आता टीम इंडियाची धावसंख्या 112 वर 2 बाद अशी झाली आहे. बांगलादेशचा गोलंदाज रिशाद हुसेन याने विराटची विकेट घेतली. 

20 Feb 2025, 19:00 वाजता

रोहित शर्माच्या रूपाने टीम इंडियाने गमावली पहिली विकेट 

भारताचा कर्णधार आणि सलामी फलंदाज रोहित शर्मा याची बांगलादेश विरुद्ध फलंदाजी करताना विकेट पडली. रोहित शर्माच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला असून रोहितने 36 बॉलमध्ये 41 धावा केल्या होत्या. दरम्यान त्याने 7 चौकार लगावले. 

20 Feb 2025, 18:57 वाजता

IND VS BAN : वनडेत रोहित शर्माच्या 11000 धावा पूर्ण 

भारताचा कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा याच्या वनडेत 11 हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. बांगलादेश विरुद्ध खेळी करताना 14 धावा करताच वनडेत रोहितने 11 हजार धावांचा टप्पा गाठला. 

20 Feb 2025, 18:11 वाजता

बांगलादेश ऑल आउट करण्यात टीम इंडियाला यश, विजयासाठी 229 धावांचं टार्गेट 

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशला 228 धावांवर ऑल आउट केलं असून टीम इंडियाला विजयासाठी आता 229 धावांचं टार्गेट मिळालं आहे. 

20 Feb 2025, 18:03 वाजता

बांगलादेशचा फलंदाज तौहीद हृदोयने ठोकलं शतक, भारताविरुद्ध मोठी कामगिरी 

बांगलादेशचा फलंदाज तौहीद हृदोयने भारताविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात दणदणीत शतक ठोकलं आहे. त्याने 114 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं असून भारताविरुद्ध मोठी कामगिरी केली आहे. 

20 Feb 2025, 18:03 वाजता

मोहम्मद शमीचा बांगलादेशला जोरदार धक्का, 5 विकेट्स घेत रचला इतिहास 

भारताचा गोलंदाज मोहम्मद शमी याने बांगलादेश विरुद्ध पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ४९ व्या ओव्हरला तस्किन अहमदला बाद केले असून यासह सामन्यातील ५ विकेट्स पूर्ण केल्या. यासह मोहम्मद शमी हा लिमिटेड ओव्हर फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. 

20 Feb 2025, 17:46 वाजता

बांगलादेशला सातवा धक्का, हर्षित राणाला दुसरं यश 

भारताचा गोलंदाज हर्षित राणा याला  बांगलादेश विरुद्ध दुसरी विकेट मिळाली आहे. राणाने बांगलादेशच्या रिशाद हुसेनची विकेट घेतली असून ४६ व्या ओव्हरला  त्याला बाद केले. यावेळी बांगलादेशचा स्कोअर 7 बाद 214 इतका होता.