IND vs BAN LIVE Score: भारताचा बांगलादेशवर दमदार विजय, आता पुढचा सामना पाकिस्तानशी

IND vs BAN Live Score Updates in Marathi: भारत 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध सामन्यासह टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात करेल. या सामन्याचे क्षणोक्षणीचे अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.   

IND vs BAN LIVE Score: भारताचा बांगलादेशवर दमदार विजय, आता पुढचा सामना पाकिस्तानशी

Champion Trophy 2025, India vs Bangladesh LIVE Scorecard and Updates: भारत 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध सामन्यासह टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मोहिमेला सुरुवात करेल. या सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या. 

 

20 Feb 2025, 14:55 वाजता

Ind vs Ban Live score:  भारताची दमदार गोलंदाजी सुरू 

दुबईत बांगलादेशविरुद्ध भारतीय संघाची गोलंदाजी सुरू झाली आहे. मोहम्मद शमी पहिले षटक टाकायला आला. त्याचवेळी बांगलादेशकडून तनजीद आणि सौम्या सरकार यांनी फलंदाजीला सुरुवात केली. टीम इंडियाची नजर जिंकण्याकडे आहे. 

20 Feb 2025, 14:45 वाजता

सामन्याच्या सुरुवातीलाच बांग्लादेशच्या दोन विकेट्स घेण्यात भारताला यश 

बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. त्यानंतर मैदानात गोलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने बांगलादेशच्या दोन विकेट्स घेतल्या. पहिल्या ओव्हरला सौम्या सरकारला बाद करण्यात मोहम्मद शमीला यश आले. तर दुसऱ्या ओव्हरला बांगलादेशचा कॅप्टन नजमुल हुसेन शांतो याची हर्षित राणाने विकेट घेतली. 

20 Feb 2025, 14:12 वाजता

कशी आहे बांगलादेशची प्लेईंग 11?

तन्झीद हसन, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकिपर), मेहदी हसन मिराझ, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान.

20 Feb 2025, 14:11 वाजता

कशी आहे भारताची प्लेईंग 11?

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव

20 Feb 2025, 14:04 वाजता

कोणी जिंकला टॉस?

बांगलादेशने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

20 Feb 2025, 14:01 वाजता

तिरंग्याच्या वादावर पाकिस्तानने गुडघे टेकले, कराचीमध्ये झळकला भारताचा ध्वज

ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कराचीतील नॅशनल स्टेडियमवर भारतीय ध्वज नसल्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता यात सुधारणा झाल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या ताज्या फोटोमध्ये दिसून येत आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सहभागी होणाऱ्या इतर देशांसोबत भारताचा ध्वजही लावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा नॅशनल स्टेडियममध्ये भारताचा ध्वज दिसत नव्हता तेव्हा मोठा वाद झाला होत. 

इथे वाचा सविस्तर: Champions Trophy 2025: अखेरीस तिरंग्याच्या वादावर पाकिस्तानने गुडघे टेकले, कराचीमध्ये झळकला भारताचा ध्वज

 

20 Feb 2025, 13:47 वाजता

भारतासमोर बांगलादेशचे आव्हान, काही वेळात होणार टॉस 

भारतीय संघ आज चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करत आहे. दुबईतील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर त्याचा सामना बांगलादेशशी होणार आहे. अ गटातील हा दुसरा सामना आहे. 2 वाजता या सामन्याचा टॉस होणार आहे. 

20 Feb 2025, 13:23 वाजता

बांगलादेश संघात तणाव  

बांगलादेश देखील तणावातून जात आहे आणि शाकिब अल हसनसारख्या स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे तो कमकुवत झाला आहे या वस्तुस्थितीपासून भारताला दिलासा मिळू शकतो.

20 Feb 2025, 12:30 वाजता

भारत तीन फिरकीपटू मैदानात उतरण्याची शक्यता आहे

भारत तीन फिरकीपटू खेळवण्याची शक्यता आहे, तर हार्दिक पांड्या वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू असेल. पण इथे रवींद्र जडेजा आणि अक्षर यांच्यानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये तिसरा फिरकीपटू कोण असेल याचाही विचार भारताला करावा लागेल.

20 Feb 2025, 12:13 वाजता

रोहित फॉर्ममध्ये परतला

काही दिवसांपूर्वी कर्णधार रोहितने शानदार शतक आणि कोहलीने इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावले होते, तर गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताने टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत अनुक्रमे 4-1 आणि 3-0 असा नेत्रदीपक विजय नोंदवला होता. गिलने चमकदार कामगिरी केली आणि इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावून मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतापुढील आव्हान हे घरच्या मालिकेपेक्षा खूपच वेगळे आहे.