Champion Trophy 2025, India vs Bangladesh LIVE Scorecard and Updates: भारत 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध सामन्यासह टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मोहिमेला सुरुवात करेल. या सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
20 Feb 2025, 11:55 वाजता
भारत आणि बांगलादेशची संभाव्य Playing XI कशी असेल याबाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात
सविस्तर वाचा: IND Playing XI vs BAN: दुबईत 3 फिरकीपटू खेळणार टीम इंडिया? 'ही' आहे भारत-बांगलादेशची संभाव्य प्लेइंग 11
20 Feb 2025, 11:53 वाजता
संघात कोणते खेळाडू असू शकतात? (Playing 11 of India)
भारतीय संघाला आपले सर्व सामने दुबईत खेळायचे आहेत. अशा स्थितीत प्लेइंग-11 मध्ये तीन फिरकीपटू ठेवायचे की तीन स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजांचा समावेश करायचा, हा विचार करण्याचा विषय ठरेल.
20 Feb 2025, 11:33 वाजता
आयसीसी स्पर्धांमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश आमनेसामने
- एकूण खेळलेले सामने: 6
- भारत जिंकला: 5
- बांगलादेश जिंकला: 1
20 Feb 2025, 11:00 वाजता
एकदिवसीय सामन्यात भारत विरुद्ध बांगलादेश आमनेसामने
खेळलेले सामने: 41
भारत विजय: 32
बांगलादेश विजयः 8
कोणतेही परिणाम नाहीत: 1
20 Feb 2025, 10:29 वाजता
जाणून घ्या हवामानाचा अंदाज आणि पीच रिपोर्ट
अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला अखेरीस १९ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली असून आपल्या टीम इंडियाचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रंगणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश असा हा सामना रंगणार आहे. भारताने या सामन्यासाठी नेटमध्ये खूप घाम गाळला आहे, मात्र या सामन्यात पाऊस खलनायक ठरू शकतो. अंदाज खरा ठरल्यास भारताला आपले प्लॅन्स बदलावे लागतील.
सविस्तर रिपोर्ट इथे वाचा: IND vs BAN Pitch Report: भारत-बांगलादेश सामन्यात पाऊस ठरणार खलनायक? जाणून घ्या हवामानाचा अंदाज आणि पीच रिपोर्ट
20 Feb 2025, 10:21 वाजता
सामना टीव्हीवर लाईव्ह कुठे बघाता येईल?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत विरुद्ध बांगलादेश सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यादरम्यान भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याचे भारतात थेट प्रक्षेपण करेल.
20 Feb 2025, 09:55 वाजता
सामन्याची वेळ काय आहे?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याची थेट वेळ किती आहे? चॅम्पियन्स ट्रॉफी मधील दुसरा सामना भारत विरुद्ध बांगलादेश ( IND Vs BAN) सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल.
20 Feb 2025, 09:24 वाजता
भारताचा पहिला सामना
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहेत. 20 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळेल.
20 Feb 2025, 09:23 वाजता
भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. यामध्ये बीसीसीआयने सुरक्षेचे कारण सांगितले आहे. या कारणामुळे यंदा ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवण्यात येणार असून भारताचे सामने पाकिस्तान आणि दुबईत खेळवले जातील.
20 Feb 2025, 09:22 वाजता
पाकिस्तानकडे आहे यजमानपद
यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खेळवत आहे. यंदा पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमानपद आहे. यासाठी पाकिस्तानने जय्यत तयारी केली आहे.