IPL 2025 Mega Auction LIVE: मुंबई इंडियन्सचा शिलेदार आता हैदराबादकडून खेळणार, 11.25 कोटींची लावली बोली

IPL 2025 Mega Auction LIVE Updates in Marathi: आयपीएल 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे होणार आहे. यासाठी 577 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

IPL 2025 Mega Auction LIVE: मुंबई इंडियन्सचा शिलेदार आता हैदराबादकडून खेळणार, 11.25 कोटींची लावली बोली

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: दोन दिवस  चालणार मेगा लिलाव 

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएल 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबिया येथील जेद्दाह येथे होणार आहे. यासाठी 577 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यापैकी 366 भारतीय आणि 208 परदेशी खेळाडू आहेत. या यादीत सहयोगी देशांतील तीन खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. 

24 Nov 2024, 19:16 वाजता

IPL Auction 2025 Live: डेविड वॉर्नर- UNSOLD

डेविड वॉर्नरने 2016 मध्ये सनराइजर्स हैदराबादला त्याच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनवले. मागच्या वेळी तो दिल्ली कॅपिटल्स संघात होता.

24 Nov 2024, 19:11 वाजता

व्यंकटेश अय्यरची घरवापसी, ऑक्शनमध्ये सर्वाधिक बोली लागलेला ठरला तिसरा भारतीय

व्यंकटेश अय्यरची घरवापसी झाली असून कोलकाता नाईट रायडर्सने अय्यरला 23.75 कोटींना विकत घेतला आहे. व्यंकटेश अय्यरसाठी आरसीबी आणि केकेआरमध्ये मोठी फाईट रंगली होती. पंत आणि श्रेयसनंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली मिळालेला व्यंकटेश अय्यर तिसरा भारतीय खेळाडू आहे.

24 Nov 2024, 19:05 वाजता

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: डेवोन कॉनवेची घरवापसी 

एडेन मार्कराम - लखनऊ सुपर जाएंट्स- 2 कोटी रुपये

डेवोन कॉनवे- चेन्नई सुपरकिंग्स - 6.25 कोटी रुपये

राहुल त्रिपाठी- चेन्नई सुपरकिंग्स - 3. 40 कोटी रुपये

जैक फ्रेजर मैकगर्क- दिल्ली कैपिटल्स- 9 कोटी रुपये

हर्षल पटेल- सनराइजर्स हैदराबाद- 8 कोटी रुपये

रचिन रवींद्र- चेन्नई सुपरकिंग्स- 4 कोटी रुपये

24 Nov 2024, 18:49 वाजता

IPL Auction 2025 Live: देवदत्त पडिक्कल राहिला UNSOLD

कर्नाटकचा फलंदाज देवदत्त पडिक्कल राहिला अनसोल्ड. देवदत्त पडिक्कल याआधी आरसीबी, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळला आहे.

24 Nov 2024, 18:41 वाजता

IPL Auction 2025 Live: हॅरी ब्रूकला दिल्लीने विकत घेतले

दिल्ली कॅपिटल्सने हॅरी ब्रूकला 6.25 कोटींना विकत घेतले आहे. त्यांनी ब्रूकसाठी पंजाब किंग्ज आणिरॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांना मागे सोडले. ब्रूक याआधी सनराइजर्स हैदराबादकडून खेळला आहे.

24 Nov 2024, 18:23 वाजता

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  मार्की खेळाडूंची यादी 

 

  • अर्शदीप सिंग- पंजाब किंग्स- 18 कोटी रुपये
  • कागिसो रबाडा- गुजरात टायटन्स- 10.75 कोटी
  • श्रेयस अय्यर- पंजाब किंग्स- 26.75 कोटी रु
  • जोस बटलर- गुजरात टायटन्स- 15.75 कोटी
  • मिचेल स्टार्क- दिल्ली कॅपिटल्स- 11.75 कोटी रु
  • ऋषभ पंत- लखनौ सुपर जायंट्स- 27 कोटी

24 Nov 2024, 17:46 वाजता

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरची बोली मिस केलीत? बघा चुरशीची बोली 

 

 

24 Nov 2024, 17:42 वाजता

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  केएल राहुलला  दिल्ली कॅपिटल्सने 14 कोटी रुपयांना विकत घेतले.

 

24 Nov 2024, 17:36 वाजता

KL Rahul: दिल्लीने विकत घेतले केएल राहुलला 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने 14 कोटींना विकत घेतले. राहुलला अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळाला. त्याला 20-25 कोटी रुपये मिळतील अशी चर्चा होती, मात्र तसे झाले नाही. त्याच्या घरच्या संघ आरसीबीनेही त्याला विकत घेतले नाही. चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने राहुलला विकत घेतले. चेन्नईने राहुलसाठी 13.75 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. त्याच्यासाठी 10.50 कोटी रुपयांची बोली लावल्यानंतर आरसीबीने स्वतःला शर्यतीतून बाहेर काढले.

 

 

24 Nov 2024, 17:30 वाजता

Liam Livingstone: ​आरसीबीने विकत घेतले लियाम  लिव्हिंगस्टोनला 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनला 8.75 कोटी रुपयांना विकत घेतले. लियामसाठी आरसीबी, सनरायझर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात चुरशीची स्पर्धा होती. अखेर आरसीबीने सर्वांना हरवून लियामला विकत घेतले.