IPL 2025 Mega Auction LIVE: मुंबई इंडियन्सचा शिलेदार आता हैदराबादकडून खेळणार, 11.25 कोटींची लावली बोली

IPL 2025 Mega Auction LIVE Updates in Marathi: आयपीएल 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे होणार आहे. यासाठी 577 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

IPL 2025 Mega Auction LIVE: मुंबई इंडियन्सचा शिलेदार आता हैदराबादकडून खेळणार, 11.25 कोटींची लावली बोली

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: दोन दिवस  चालणार मेगा लिलाव 

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएल 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबिया येथील जेद्दाह येथे होणार आहे. यासाठी 577 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यापैकी 366 भारतीय आणि 208 परदेशी खेळाडू आहेत. या यादीत सहयोगी देशांतील तीन खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. 

24 Nov 2024, 16:17 वाजता

श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  श्रेयस अय्यर 2 कोटी मूळ किंमत होती. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जने त्याच्यामध्ये स्वारस्य दाखवले. श्रेयस अय्यरने IPL लिलावात विक्रम केला. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडी बोली पंजाब किंग्जने 26 कोटी 25 लाख रुपयांवर लावली आहे.

 

24 Nov 2024, 16:07 वाजता

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडा गेला गुजरातला 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  मेगा लिलावात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आले. त्यांच्यासाठी तीन संघांमध्ये चुरशीची लढत झाली. आरसीबी, गुजरात आणि मुंबई इंडियन्सने त्याला खरेदी करण्यात रस दाखवला. मुंबईने ९.२५ कोटी रुपयांची बोली संपवली. गुजरात टायटन्सने आरसीबीचा पराभव करत रबाडाला 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले.

24 Nov 2024, 16:07 वाजता

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडा गेला गुजरातला 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  मेगा लिलावात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आले. त्यांच्यासाठी तीन संघांमध्ये चुरशीची लढत झाली. आरसीबी, गुजरात आणि मुंबई इंडियन्सने त्याला खरेदी करण्यात रस दाखवला. मुंबईने ९.२५ कोटी रुपयांची बोली संपवली. गुजरात टायटन्सने आरसीबीचा पराभव करत रबाडाला 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले.

24 Nov 2024, 16:02 वाजता

पंजाबने अर्शदीपला घेतले विकत 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  आयपीएलच्या लिलावात अर्शदीप सिंगचे नाव पहिल्यांदा समोर आले. चेन्नई सुपर किंग्जने त्याच्यासाठी पहिली बोली लावली. दिल्ली कॅपिटल्सने त्याला कडवी झुंज दिली. सनरायझर्सने राजस्थानचा पराभव करून अर्शदीपला १५.७५ कोटी रुपयांना विकत घेतले, पण पंजाब किंग्जने आरटीएम कार्डने खेळ फिरवला. सनरायझर्सने पुन्हा 18 कोटींची बोली लावली. पंजाबने 18 कोटींची ऑफर मान्य करत अर्शदीपला विकत घेतले. अर्शदीप पुन्हा आपल्या जुन्या संघात परतला.

 

24 Nov 2024, 15:52 वाजता

'या' खेळाडूवर लागली पहिली बोली 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: मल्लिका सागर यावेळी आयपीएल लिलाव करणारी आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी लिलावाचे पहिले नाव दिले, ते म्हणजे अर्शदीप सिंग. अर्शदीप सिंगवर बोली लावण्यास सुरुवात झाली आहे. 

 

24 Nov 2024, 15:47 वाजता

मेगा ऑक्शन फ्रीमध्ये कुठे पाहता येणार? 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  बीसीसीआयने आयपीएल मेगा ऑक्शन 2025 सुरु झाले आहे. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनचं लाईव्ह टेलिकास्ट हे 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3: 30 वाजल्यापासून टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल, तर जिओ सिनेमा अँप आणि वेबसाईटवर ऑक्शनचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात येईल. 

 

24 Nov 2024, 15:41 वाजता

पर्थमध्ये सामना संपल्यावर मेगा लिलावाला सुरुवात 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: पर्थ कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ रोमहर्षकपणे भारताच्या बाजूने संपला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 धावांचे लक्ष्य ठेवल्यानंतर भारताने दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमान कांगारूंच्या 12/3 विकेट्स पडल्या आहेत. आता भारताला विजयासाठी आणखी 7 विकेट्सची गरज आहे. आजच्या दिवसाचा खेळ संपल्यावर आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाची सुरुवात होत आहे.  

24 Nov 2024, 15:36 वाजता

पहिल्या दिवशी  केवळ 84 खेळाडूंवर बोली लावली जाणार 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  IPL 2025 च्या मेगा लिलावात पहिल्या दिवशी फक्त 84 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, जोस बटलर यांसारख्या मोठ्या खेळाडूंवर आज बोली लावली जाणार आहे.

24 Nov 2024, 15:32 वाजता

यावेळी मेगा लिलावात कोण ठरणार लिलाव?

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  मल्लिका सागर सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल लिलावासाठी लिलाव करणार आहे. गेल्या वर्षी ही भूमिका घेणारी ती पहिली महिला ठरली आणि तिने उत्कृष्ट काम केले. तिने  ह्यू एडमीड्सची जागा घेतली. मल्लिकाने डब्ल्यूपीएल आणि पीकेएलचाही लिलाव केला आहे.

 

24 Nov 2024, 15:15 वाजता

लवकरच सुरू होईल मेगा लिलाव 

लिलावाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. संघांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि प्रतिनिधी लिलाव कक्षात पोहोचले आहेत. आता काही वेळात खेळाडूंचा लिलाव सुरू होईल.