IPL 2025 Mega Auction LIVE: मुंबई इंडियन्सचा सिलेदार आता हैदराबादकडून खेळणार, 11.25 कोटींची लावली बोली

IPL 2025 Mega Auction LIVE Updates in Marathi: आयपीएल 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे होणार आहे. यासाठी 577 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

IPL 2025 Mega Auction LIVE: मुंबई इंडियन्सचा सिलेदार आता हैदराबादकडून खेळणार, 11.25 कोटींची लावली बोली

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: दोन दिवस  चालणार मेगा लिलाव 

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएल 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबिया येथील जेद्दाह येथे होणार आहे. यासाठी 577 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यापैकी 366 भारतीय आणि 208 परदेशी खेळाडू आहेत. या यादीत सहयोगी देशांतील तीन खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. 

24 Nov 2024, 20:47 वाजता

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: मुंबई इंडियन्सने खरेदी केला खतरनाक गोलंदाज

आवेश खान - लखनऊने - 9.75 कोटी रुपये

ऑनरिक नॉर्खिया- कोलकाता नाइट राइडर्स- 6.50 कोटी रुपये

जोफ्रा आर्चर- राजस्थान रॉयल्स- 6.50 कोटी रुपये

खलील अहमद- चेन्नई सुपर किंग्स- 4.80 कोटी रुपये

टी नटराजन- दिल्ली कॅपिटल्स - 10.75 कोटी रुपये

ट्रेंट बोल्ट- मुंबई इंडियन्स - 12.50 कोटी रुपये

24 Nov 2024, 20:35 वाजता

 IPL Auction 2025 Live: गुजरात टायटन्सने प्रसिद्ध कृष्णाला 9.50 कोटींना विकत घेतलं

गुजरात टायटन्सने भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला 9.50 कोटींमध्ये विकत घेतलं. त्याचा जुना संघ राजस्थान रॉयल्सने 9.25 कोटींपर्यंत बोली लावली पण यामध्ये गुजरात टायटन्सने बाजी मारली.

24 Nov 2024, 20:17 वाजता

IPL Auction 2025 Live:  जोश हेझलवूडला आरसीबीने 12 कोटींना घेतलं

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड पुन्हा आरसीबीमध्ये परतला आहे. आरसीबीने त्याला 12.50 कोटींना विकत घेतलं आहे. 

24 Nov 2024, 20:05 वाजता

IPL Auction 2025 Live: मुंबई इंडियनसचा सिलेदार आता हैदराबादकडून खेळणार, 11.25 कोटींची लावली बोली

मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू ईशान किशनला मेगा ऑक्शनमध्ये सनरायजर्स हैदराबादने 11. 25 कोटींची बोली लावून विकत घेतलं.

24 Nov 2024, 20:01 वाजता

IPL Auction 2025 Live: फिल साल्टला आरसीबी तर गुरबाजला कोलकाताने विकत घेतले

इंग्लंडचा विकेटकीपर फलंदाज फिल साल्टला रॉयल चैलेंजर्स बेंगलुरुने 11.50 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. तर कोलकाताचे जुने विकेटकीपर फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज़ला 2 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले.

24 Nov 2024, 19:51 वाजता

IPL Auction 2025 Live: जॉनी बेयरस्टो UNSOLD

इंग्लंडचा विकेटकीपर फलंदाज जॉनी बेयरस्टोला कोणीही विकत घेतले नाही. तो यापूर्वी पंजाब किंग्जचा सदस्य होता.

24 Nov 2024, 19:35 वाजता

IPL Auction 2025 Live: ग्लेन मैक्सवेलची पंजाब किंग्स संघात घरवापसी

ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर ग्लेन मैक्सवेलला पंजाब किंग्सने 4.20 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे. 

24 Nov 2024, 19:28 वाजता

IPL Auction 2025 Live: लखनऊ सुपर जाएंट्स संघात मिशेल मार्श

ऑस्ट्रेलियाच्या ऑलराउंडर मिशेल मार्शला लखनऊ सुपर जाएंट्सने 3.40 कोटींमध्ये विकत घेतलं आहे. 

24 Nov 2024, 19:21 वाजता

IPL Auction 2025 Live: रविचंद्रन अश्विनवर CSK ने लावली बोली

चेन्नई सुपरकिंग्सने रविचंद्रन अश्विनला 9.75 कोटी रुपयांना विकत घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. 

24 Nov 2024, 19:16 वाजता

IPL Auction 2025 Live: डेविड वॉर्नर- UNSOLD

डेविड वॉर्नरने 2016 मध्ये सनराइजर्स हैदराबादला त्याच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनवले. मागच्या वेळी तो दिल्ली कॅपिटल्स संघात होता.