IPL 2025 Mega Auction LIVE: मुंबई इंडियन्सचा शिलेदार आता हैदराबादकडून खेळणार, 11.25 कोटींची लावली बोली

IPL 2025 Mega Auction LIVE Updates in Marathi: आयपीएल 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे होणार आहे. यासाठी 577 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

IPL 2025 Mega Auction LIVE: मुंबई इंडियन्सचा शिलेदार आता हैदराबादकडून खेळणार, 11.25 कोटींची लावली बोली

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: दोन दिवस  चालणार मेगा लिलाव 

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएल 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबिया येथील जेद्दाह येथे होणार आहे. यासाठी 577 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यापैकी 366 भारतीय आणि 208 परदेशी खेळाडू आहेत. या यादीत सहयोगी देशांतील तीन खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. 

24 Nov 2024, 17:27 वाजता

Mohammed Siraj: मोहम्मद सिराज विकत घेतले गुजरातने 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  गुजरात टायटन्सने मोहम्मद सिराजला विकत घेतले आहे. त्याने सिराजसाठी 12.25 कोटींची बोली लावली. चेन्नई सुपर किंग्जने 8 कोटींची बोली लावल्यानंतर माघार घेतली. यानंतर गुजरात आणि राजस्थानमध्ये वरचढ झाली. पण शेवटी  राजस्थानने 12 कोटी रुपयांची बोली लावल्यानंतर माघार घेतली आणि गुजरातला सिराजने 12.25 कोटी रुपयांना विकत घेतले.

 

 

24 Nov 2024, 17:19 वाजता

Yuzvendra Chahal:  पंजाबने चहलला विकत घेतले

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  भारताचा दिग्गज लेगस्पिनर युजवेंद्र चहल याच्या लिलावादरम्यान बरीच चर्चा झाली. चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात चुरशीची स्पर्धा होती. 5.50 कोटींची बोली लावल्यानंतर चेन्नईने स्वतःला दूर केले.त्याच वेळी, गुजरातने 6.75 कोटींनंतर शर्यतीपासून स्वतःला दूर केले. पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पुन्हा चुरशीची स्पर्धा झाली. दरम्यान, सनरायझर्सनेही बोली लावली, पण पंजाब किंग्जने सर्वांचा पराभव करत चहलला 18 कोटी रुपयांना खरेदी केले. 

 

24 Nov 2024, 17:11 वाजता

David Miller:  लखनौने डेव्हिड मिलरला विकत घेतले

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलरला लखनऊ सुपर जायंट्सने 7.50 कोटींना विकत घेतले. गुजरात टायटन्सने त्यांच्यासाठी आरटीएमचा वापर केला नाही.

 

 

24 Nov 2024, 17:08 वाजता

Mohammed Shami: शमीला सनरायझर्सने विकत घेतले

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  भारताचा झंझावाती वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सनरायझर्स हैदराबादने 10 कोटी रुपयांना विकत घेतले. कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात शमीसाठी चुरशीची स्पर्धा होती. शेवटी सनरायझर्सने बाजी मारली.

 

 

24 Nov 2024, 17:01 वाजता

लिलावाचा पहिला सेट समाप्त

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: आयपीएल मेगा लिलावाचा पहिला सेट संपला.  या सेटमध्ये 6 खेळाडूंवर बोली लागली.

 

  • अर्शदीप सिंग- पंजाब किंग्स- 18 कोटी रुपये
  • कागिसो रबाडा- गुजरात टायटन्स- 10.75 कोटी
  • श्रेयस अय्यर- पंजाब किंग्स- 26.75 कोटी रु
  • जोस बटलर- गुजरात टायटन्स- 15.75 कोटी
  • मिचेल स्टार्क- दिल्ली कॅपिटल्स- 11.75 कोटी रु
  • ऋषभ पंत- लखनौ सुपर जायंट्स- रु. २७ कोटी

हे ही वाचा: 'या' पाच खेळाडूंवर लागू शकते करोडोंची बोली!

 

24 Nov 2024, 16:54 वाजता

पहिल्या सेटमध्ये एकूण किती खेळाडू विकले गेले? 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या मेगा लिलावाला सुरुवात झाली आहे. या लिलावाच्या पहिल्या सेटमध्ये एकूण 6 खेळाडूंवर मोठ्या बोली लागल्या. यामध्ये सर्वात मोठी बोली ऋषभ पंतवर 27 कोटींची तर श्रेयस अय्यरवर 26.75 कोटींची बोली लागली. याशिवाय जोस बटलर, अर्शदीप सिंग, मिचेल स्टार्क आणि कागिसो रबाडा हे खेळाडू ही या सेटमध्ये विकले गेले.

24 Nov 2024, 16:51 वाजता

IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतवर यावेळी मोठी बोली लागली. त्याची मूळ किंमत २ कोटी होती. लखनौने त्याच्यासाठी सर्वप्रथम बोली लावली. त्यानंतर आरसीबीनेही बोली लावली. पण शेवटी लखनौ जिंकला आणि ऋषभ पंतला 27 कोटींना विकत घेतलं. दिल्लीने त्याच्यासाठी आरटीएम कार्ड घेतले होते, त्यानंतर एलएसजीने पंतसाठी 27 कोटी रुपयांची बोली लावली. ही बोली पाहिल्यानंतर दिल्लीने पुन्हा पंतसाठी आरटीएम कार्ड वापरले नाही.

 

 

24 Nov 2024, 16:42 वाजता

ऋषभ पंत २७ कोटींना विकला गेला 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटींना विकत घेतले. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. काही मिनिटांपूर्वी श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते. आता पंत 27 कोटींसह त्याच्या पुढे गेला आहे.

 

24 Nov 2024, 16:32 वाजता

मिचेल स्टार्कला दिल्ली कॅपिटल्सने घेतले विकत 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर (2 कोटी आधारभूत किंमत) बेट लावले गेले. सुरुवातील किंमत 6.50 कोटींवर पोहोचली. शेवटी मिचेल स्टार्कला (2 कोटी मूळ किंमत) दिल्ली कॅपिटल्सने (DC) 11.75 कोटी रुपयांना विकत घेतले.

 

 

24 Nov 2024, 16:28 वाजता

15.50 कोटी रुपयांना गुजरातने घेतलं जोस बटलरला 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरसाठी अनेक संघांमध्ये स्पर्धा होती. त्यांच्या राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात चुरशीची लढत झाली. राजस्थानने ९.२५ कोटींनंतर स्वतःला दूर केले.येथून पंजाब किंग्जने गुजरातला स्पर्धा देण्यास सुरुवात केली. पंजाबने 13.25 कोटींनंतर स्वतःला दूर केले. येथून लखनौ सुपर जायंट्सने गुजरातशी स्पर्धा करण्यासाठी प्रवेश केला. दोघांमध्ये चुरशीची लढत झाली, पण शेवटी गुजरातने बाजी मारली. गुजरातने त्याला 15.50 कोटी रुपयांना खरेदी केले.