पंजाब कुठे कमी पडलं? 6 व्या पराभवानंतर कॅप्टन मयंक अग्रवालनं सांगितली मोठी गोष्ट

प्लेऑफमध्ये पोहोचणं कठीण झाल्याने कॅप्टन मयंक अग्रवाल चि़डला, सांगितलं पराभवाचं कारण

Updated: May 8, 2022, 07:52 AM IST
पंजाब कुठे कमी पडलं? 6 व्या पराभवानंतर कॅप्टन मयंक अग्रवालनं सांगितली मोठी गोष्ट title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात पंजाब विरुद्ध राजस्थान सामना झाला. या सामन्यात पंजाबला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार मयंक अग्रवालने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. टीमने 20 ओव्हरमध्ये 189 धावा केल्या. 

पंजाबचे बॉलर्स थोडे कमी पडले. ज्यामुळे राजस्थानला पंजाबवर विजय मिळवणं अधिक सोपं झालं. कर्णधार मयंक अग्रवालने पराभवाचं कारण सांगितलं आहे. 

पंजाबचा हा सहावा पराभव आहे. मला वाटतं की आम्ही स्कोअर  खूप चांगला केला. मात्र बॉलिंगमध्ये कमी पडलो. तिथे आम्हाला काम करण्याची खूप जास्त आवश्यकता आहे. मयंकने बोलताना अर्शदीपचंही कौतुक केलं. 

मयंक अग्रवालने पराभवाचं खापर बॉलर्सवर फोडलं. 15 व्या हंगामात पंजाब किंग्जने आतापर्यंत 11 सामने खेळले.  त्यापैकी टीमने 5 सामने जिंकले असून 6 सामने गमावले आहेत. पंजाब पॉईंट टेबलवर सातव्या स्थानावर आहे. 

हा सामना जिंकला असता तर प्लेऑफपर्यंत जाण्याचा मार्ग सोपा झाला असता. मात्र ही संधी पंजाबने गमावली. टीमला त्यांच्या मागील 5 सामन्यांपैकी 3 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

राजस्थान टीमच्या फलंदाजांनी अनोखी कामगिरी केली. 4 विकेट्स गमावून 190 धावा केल्या. यशस्वी जयस्वालने सर्वात जास्त धावा केल्या. 41 बॉलमध्ये त्याने 68 धावांची खेळी केली. त्यामध्ये 2 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश आहे. 

जोस बटलरने 30 धावा केल्या तर शिमरन हेटमायरने 16 बॉलमध्ये 31 धावा केल्या आहेत. ज्याचा फायदा टीमला झाला. राजस्थान टीमला प्लेऑफमध्ये