Olympics 2032: या शहरात होणार ऑलिम्पिक गेम्स, ऑलिम्पिक कमिटीकडून मोठी घोषणा

2032 मध्ये ऑलिम्पिक गेम्स कुठे होणार याची उत्सुकता सर्वांना होती. नुकतीच यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे.

Updated: Jul 21, 2021, 08:36 PM IST
Olympics 2032: या शहरात होणार ऑलिम्पिक गेम्स, ऑलिम्पिक कमिटीकडून मोठी घोषणा title=

मुंबई: 2032 मध्ये ऑलिम्पिक गेम्स कुठे होणार याची उत्सुकता सर्वांना होती. नुकतीच यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. 2032मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा ही ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन इथे होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीने बुधवारी या संदर्भात अधिकृत घोषणा केली. आयओसीच्या 138 व्या मोसमात 2032 उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान ब्रेस्बेनला मिळाला आहे. 

या आधी ऑस्ट्रेलियाने दोनदा ऑलिम्पिकचे आयोजन केलं होतं. यात 1956 मध्ये मेलबर्न आणि 2000 सिडनी ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आलं होतं. 2017मध्ये ऑलिम्पिक आईओसी आणि 2024चं ऑलिम्पिक पॅरीस तर 2028चं ऑलिम्पिकचं आयोजन लॉस एन्जलिस इथे करण्यात आलं आहे. 

टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन यावेळी जपानची राजधानी टोकियोमध्ये करण्यात आलं आहे. टोकियो ऑलिम्पिक 23 जुलैपासून सुरू होणार असून शेवटचा सामना 8 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. यावेळी 127 खेळाडू सहभागी होणार आहेत.

 भारताकडून उतरलेले खेळाडू यावेळी नक्की उत्तम कामगिरी करून येतील अशी सर्वांनाच आशा आहे. टोकियोनंतर 2024 मध्ये फ्रान्सच्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर 2028 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात येईल.