नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताला हार पत्करावी लागली. यामुळे सलग दहा वन डे जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले. यामध्ये प्रथम बॅटिंग करत ऑस्ट्रेलियाने ३३५ रन्सचे लक्ष ठेवले होते. पण ५० ओव्हरमध्ये भारताला ८ विकेट्सच्या बदल्यात ३१३ रन्सच बनवता आले.
The change in batting order was a good experiment but it meant Dhoni was batting out of position. It is something to think about
— Harsha Bhogle (@bhogleharsha) September 28, 2017
या पराजयानंतर बॅटिंग ऑर्डरवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. मॅच संपल्यानंतर ट्विटरवर 'माही' टॉप ट्रेंडींगमध्ये राहिला. सोशल मीडियावर अनेकांनी यावर आपले मत प्रदर्शित केले. क्रिकेट एक्सपर्ट हर्षा भोगले यांनीही यासंबंधी एक ट्विट केले. 'तुम्ही बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करता आहात हे चांगलेच आहे पण याचा अर्थ असा नाही की धोनीच्या क्रमात बदल कराल. याबद्दल विचार करायला हवा'
हार्दिक पांड्याला चौथ्या तर महेंद्रसिंग धोनीला सातव्या स्थानावर पाठविण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करुन कोहलीने मोठी चूक केली असेही म्हटले जात आहे.