लाहोर : पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत (pak vs aus 3rd test) ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) मोठा कारनामा केला आहे. स्टीव्हने कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान 8 हजार धावा करण्याची कामगिरी केली आहे. स्टीव्हने एकूण 151 डावांमध्ये हा मोठा पराक्रम केला आहे. यासह स्टीव्हने श्रींलकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. (pak vs aus 3rd test australia steve smith break kumar sangakara and sachin tendulkar record and becoms to fastest 8 thousand runs)
स्टीव्ह आधी वेगवान 8 हजार कसोटी धावांचा विक्रम हा संगकाराच्या नावे होता. संगकाराने 152 डावांमध्ये 8 हजार धावांचा पल्ला गाठला होता. तर सचिन तेंडुलकर वेगवान 8 धावांच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी आहे. सचिनने 154 डावांमध्ये या धावा केल्या होत्या. या तिघांव्यतिरिक्त वेस्ट इंडिजचे माजी गारफिल्ड सोबर्स यांनी 157 आणि राहुल द्रविडने 158 डावात हा कारनामा केला होता.
स्टीव्हने तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात 59 धावा केल्या. मात्र दुसऱ्या डावात त्याला मोठी खेळी करता आली नाही. दुसऱ्या डावात स्टीव्ह 17 रन्स करुन तंबूत परतला.
स्मिथची कसोटी कारकिर्द
स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत एकूण 85 कसोटी सामन्यांमध्ये 59.78 च्या सरासरीने 8 हजार 10 धावा केल्या आहेत. यामध्ये स्टीव्हने 27 शानदार शतकं आणि 36 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच 3 वेळा द्विशतक ठोकलंय. कसोटीत 239 धावा ही स्टीव्हची सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. टेस्ट व्यतिरिक्त स्मिथने 128 वनडे आणि 54 टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलंय.