Pak vs Eng Memes: शेम टू शेम! मॅच हारली पण परंपरा जपली, पाकिस्तानमुळे मिळाला नवा Memes Star

Disappointed Pakistani fan meme: मोहम्मद नवाज बाद झाल्यावर स्टेडियमच्या कॅमेर्‍यात प्रेक्षक निराश दिसला. त्याने कमरेवर हात ठेवला होता. तर चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.

Updated: Nov 14, 2022, 12:06 AM IST
Pak vs Eng Memes: शेम टू शेम! मॅच हारली पण परंपरा जपली, पाकिस्तानमुळे मिळाला नवा Memes Star title=
Disappointed Pakistani fan meme star

Eng vs Pak Final 2022 : इंग्लंड टीमने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत T20 World Cup 2022 आपल्या नावावर केला आहे. या स्पर्धेमध्ये अनेक चुरशीचे सामने पहायला मिळाले. त्यानंतर इंग्लंडने पाकिस्तानला धुव्वा उडवत वर्ल्ड कपवर नाव कोरलं. या सामन्यात बेन स्टोक्सने पाकिस्तानचं स्वप्न धुळीस मिळवलं. त्यामुळे स्टोक्सची एकच चर्चा होताना दिसत आहे. मात्र, त्याचबरोबर आणखी एका तरुणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. (Pak v Eng new face of disappointed Pakistani fan memes t20 world cup final sports news)

नेमकं काय झालं?

पाकिस्तानच्या डावाच्या 19 वी ओव्हर सुरू होती. जेव्हा सॅम करनने (Sam Curran) मोहम्मद नवाजची विकेट काढली त्यामुळे सर्वत्र एकच शांतता पसरली. त्यावेळी एक प्रेक्षक कॅमेऱ्यात कैद झालाय. मोहम्मद नवाज बाद झाल्यावर स्टेडियमच्या कॅमेर्‍यात प्रेक्षक निराश (disappointed Pakistani fan) दिसला. त्याने कमरेवर हात ठेवला होता. तर चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.

पाहा पोस्ट- 

ज्यावेळी हा चेहरा दिसता, त्यावेळी पाकिस्तानच्या 129 धावा झाल्या होत्या. त्यावेळी सॅम करन 19 वी ओव्हर टाकत होता. तर वसिम 3 धावांवर खेळत होता. तसेच पाकिस्तानने 7 विकेट देखील गमावल्या होत्या. खूप कमी स्कोर झाल्यानं पाकिस्तान सामना हारणार, असं अनेकांना वाटत होतं आणि घडलीही तसंच...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

आणखी वाचा - मानलं राव! 'मॅन ऑफ द टूर्नामेंट'च्या पुरस्कारासह अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

दरम्यान, पाकिस्तानने सामना गमवल्यानंतर अनेक खेळाडू नाराज दिसले. तर काही खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले. धडपडत फायनलला जिंकलेली पाकिस्तान फायनल जिंकावी, असं पाकिस्तानी चाहत्यांना वाटत होतं. मात्र, बेन स्टोक्सने त्यांचं स्वप्न धुळीस मिळवलं आहे.