डर्बी : महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाज भेदक मारा करतायत. भारताच्या भेदक माऱ्यामुळे पाकिस्तानचा अर्धा संघ अवघ्या २६ धावांत तंबूत परतलाय.
भारताकडून आतापर्यंत एकता बिश्त हिने सर्वाधिक तीन विकेट घेतल्यात. तर दिप्ती शर्मा, मानसी जोशी, झुलन गोस्वामी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतलीये.
भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत १६९ धावा केल्या. पाकिस्तानला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी १७० धावांची गरज आहे.