'तो सगळ्यांना नागडं करून....'; रोहित शर्माबद्दल हे काय बोलून गेला प्रसिद्ध अभिनेता

Rohit Sharma :  टीम इंडियाला गरज असताना इंग्लंड विरुद्ध शतकीय खेळी करून टीकाकारांची तोंड बंद केली आणि तो चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी फॉर्ममध्ये परतला.

पुजा पवार | Updated: Feb 11, 2025, 01:41 PM IST
'तो सगळ्यांना नागडं करून....'; रोहित शर्माबद्दल हे काय बोलून गेला प्रसिद्ध अभिनेता title=
(Photo Credit : Social Media)

Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दमदार शतक ठोकून पुनरागमन केलं आहे. मागील अनेक महिने रोहित वाईट फॉर्ममधून जात होता. बॉर्डर गावसकर सीरिजमधील 6 इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून साध्या 40 धावा सुद्धा निघाल्या नव्हत्या. त्यामुळे रोहित शर्माच्या कर्तृत्वावर शंका उपस्थित केल्या जात होत्या आणि क्रिकेटमधील काही दिग्गजांकडून टीका देखील होत होती. परंतु रोहितने टीम इंडियाला गरज असताना इंग्लंड विरुद्ध शतकीय खेळी करून सर्वांची तोंड बंद केली आणि तो चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी फॉर्ममध्ये परतला. सध्या पाताल लोक या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो रोहितची प्रशंसा करताना दिसतोय. 

रोहित शर्माचं दमदार कमबॅक : 

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेली वनडे सीरिज चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना कमबॅक करण्यासाठी शेवटची संधी आहे. कटक येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने दमदार खेळी केली. वयाची 30 वर्ष झाल्यावर सर्वात जास्त शतक ठोकण्याचा रेकॉर्ड त्याने आपल्या नावे केला. रोहितने या दरम्यान 76 बॉलमध्ये शतक ठोकले. त्याने 90 बॉलमध्ये 119 धावा केल्या. दरम्यान त्याने 12 चौकार 7 षटकार लगावले. हे वनडेतील त्याचे 32 वे शतक होते. 

हिटमॅनबाबत काय म्हणाला अभिनेता?

रोहित शर्माचं चांगल्या फॉर्ममध्ये कमबॅक झाल्यावर त्याचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. रोहितची प्रशंसा करणारे अनेक जुने नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  याच दरम्यान पाताल लोक या वेब सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारणारा अभिनेता जयदीप अहलावत याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यात तो एका पॉडकास्टमध्ये रोहित आणि विराट या दिग्गज खेळाडूंचं कौतुक करताना दिसतोय. अभिनेता जयदीप अहलावत याने मागील महिन्यात रौनक सोबत एक पॉडकास्ट केला होता. यात तो म्हणाला, 'रोहित शर्मा हा खूप टॅलेंटेड आहे. तो असा माणूस आहे कि जर 10 मिनिटं त्याची बॅट चालली तर तो सगळ्यांना (विरोधी संघ) नागडं करून पळवेल'.  

पाहा व्हिडीओ :

टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध सीरिजमधील दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियाने सीरिजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी घेतलीये. 12 फेब्रुवारी रोजी सीरिजमधील शेवटच्या वनडे सामन्यात सुद्धा इंग्लंडला पराभूत करून त्यांना क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न टीम इंडिया करेल.