मुंबई : प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामासाठी मुंबईत खेळाडूंचा लिलावा केला जात आहे. एकूण ४२२ खेळाडूंचा या हंगमामासाठी लिलाव केला जाणार असून पहिल्या दिवशी मोनू गोयत हा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. मोनू गोयतला हरियाणा स्टीलर्सनी १.५१ कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतलं. प्रो-कबड्डी लीगच्या लिलावामध्ये आत्तापर्यंत ६ भारतीय खेळाडू कोट्यधीश झाले आहेत. इराणचा बचावपटू फझल अत्राचली हा सर्वाधिक महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. फझलवर यु मुंबा संघानं एक कोटी रुपयांना बोली लावली. फझलला यु मुंबानं १ कोटी रुपयांना विकत घेतलं. इराणच्याच अबोझर मिघानीला तेलगु टायटन्सनं ७६ लाखाला आणि कोरियाच्या जँग कुन ली या खेळाडूला बंगाल वॉरियर्सनं ३३ लाखांना विकत घेतलं.
एकूण ४२२ खेळाडूंवर तीन भागात बोली लावली जाणार आहे. पहिल्या भागात नेहमी खेळणा-या २७७ खेळाडूंवर, दुस-या भागात ५८ परदेशी खेळाडूंवर तर टॅलेंट सर्च कार्यक्रमातून निवडण्यात आलेल्या ८७ खेळाडूंवर तिस-या भागात बोली लावली जाणार आहे.
मोनू गोयत (हरियाणा स्टीलर्स) - १.५१ कोटी रुपये
राहुल चौधरी (तेलगू टायटन्स)- १ कोटी २९ लाख रुपये
दीपक हुड्डा (जयपूर पिंक पँथर्स)- १ कोटी १५ लाख रुपये
नितीन तोमर (पुणेरी पलटण)- १ कोटी १५ लाख रुपये
रिशांक देवाडिगा (युपी योद्धा)- १ कोटी ११ लाख रुपये
सुरेंदर नाडा (हरियाणा स्टीलर्स)- ७५ लाख रुपये
संदीप कुमार (जयपूर पिंक पँथर्स)- ६६ लाख रुपये