IND vs ENG: सिरीज जिंकण्यासाठी Rohit Sharma घेणार मोठा निर्णय; 2 खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता

तिसऱ्या वनडेसाठी टीममध्ये काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. 

Updated: Jul 16, 2022, 09:02 AM IST
IND vs ENG: सिरीज जिंकण्यासाठी Rohit Sharma घेणार मोठा निर्णय; 2 खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता title=

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी होणार आहे. ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. मालिकेतील शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे. दुसऱ्या सामन्यात इंडिया टीमला 100 रन्सने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर तिसऱ्या वनडेसाठी टीममध्ये काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. 

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया रोहित शर्मा आणि शिखर धवन या अनुभवी सलामीच्या जोडीसोबत उतरणार आहे. गेल्या सामन्यात या दोन्ही फलंदाजांनी आपल्या झंझावाती फलंदाजीमुळे भारताला इंग्लंडविरुद्ध 10 विकेटने विजय मिळवून दिला होता. तेव्हा भारताने इंग्लंडला 110 धावांत गुंडाळले. टीम इंडियाच्या फलंदाजांनी 111 रन्सचं हे सोपं लक्ष्य 18.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. 

मात्र हे दोन्ही खेळाडू दुसऱ्या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरले, त्यामुळे टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं. रोहितला खातंही उघडता आलं नाही. मात्र, हे दोन्ही खेळाडू शेवटच्या सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील.

कोहलीसाठी शेवटची संधी

विराट प्रत्येक फॉरमॅटमध्ये सतत फ्लॉप होत असून कर्णधार रोहित शर्माला त्याच्याकडून खूप आशा आहेत. विराटसाठी हा सामना शेवटच्या संधीसारखा असणार आहे. सूर्यकुमार यादव पुन्हा चौथ्या क्रमांकावर येईल. त्याचवेळी पहिल्या क्रमांकावर असलेल्या ऋषभ पंत आणि इशान किशन यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार आहे.

बॉलिंग लाइन अप बदलू शकते

लेगस्पिनर युझवेंद्र चहल टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमेव स्पिनर म्हणून खेळणार आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाईल. रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या जागी अर्शदीप सिंगला संधी देणार आहे. अर्शदीपने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती.

टीम इंडियाचं संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत/ईशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल.