लंडन : भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान बर्मिंगहममध्ये गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये रोहित शर्माच्या उत्कृष्ट खेळी मागे 2 वर्षापूर्वीची जखम होती. 2015 ला बांगलादेशमध्ये खेळलेल्या सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावी लागला होती. 2015 मध्ये बांगलादेशच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला लोळवले होते. या वेळी मात्र भारतीय संघाने बांगलादेशची जोरदार धुलाई केली.
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफीझुर रेहमानने 6 षटकांत 53 धावा दिल्या. या वेळी रहमानला एकही बळी मिळाला नाही आणि तो सर्वात फ्लॉप गोलंदाज ठरला. जून 2015 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान खेळलेल्या मालिकेत, बांगलादेशने भारतीय संघाला पराभूत केले होते. तीन एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेत भारत फक्त एक सामना जिंकला होता. बांगलादेशने मालिका जिंकून मुस्तफीझुर रेहमान मालिकावीर ठरला होता. त्याच्या करियरची ती पहिली एकदिवसीय मालिका होती. पहिल्या सामन्यात मुस्तफीझुरने 5 विकेट घेतल्या होत्या, दुसऱ्या सामन्यात 6 विकेट घेऊन शेवटच्या सामन्यात दोन विकेट घेतल्या होत्या. म्हणजे तीन सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेऊन मुस्तफीझुरने भारतीय संघाला पराभूत केले होते.
रोहित शर्माने बांग्लादेशविरोधात सेमीफायनलमध्ये नाबाद 123 रन केले आणि भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. यामध्ये रोहितने मुस्तफिजुरच्या 20 बॉलमध्ये 24 रन केले. विराट कोहलीने त्याच्या 11 बॉलमध्ये 20 रन काढले. रोहितने मुस्तफिजुरला लक्ष्य केलं कारण 2015 मधील वनडेमध्ये ३ सामन्यांमध्ये रोहितला याच गोलंदाजाने आऊट केलं होतं. मुस्तफिजुरने रोहितला 63 रन, शून्य आणि 29 रनवर आऊट केलं होतं. त्यानंतर बांग्लादेशची सामना एकदाही नाही झाला. गुरुवारी दोन वर्षानंतर रोहितने संपूर्ण कसर काढली.