SA T20 : सनराइजर्सने फायनल जिंकली, काव्या मारनचा आनंद गगनात मावेना; पाहा Video

Kavya Maran Viral Video : फायनल सामना (SA T20 Final) पाहण्यासाठी संघ मालक काव्या मारनही स्टेडियममध्ये उपस्थित होती. त्यावेळी काव्याचा आनंद गगनात मावेना असा झाला होता. 

सौरभ तळेकर | Updated: Feb 11, 2024, 04:09 PM IST
SA T20 : सनराइजर्सने फायनल जिंकली, काव्या मारनचा आनंद गगनात मावेना; पाहा Video title=
Kavya Maran SA T20 Video

Kavya Maran SA T20 Video : साऊथ अफ्रिकेच्या टी-20 क्रिकेट लीगमध्ये सनरायझर्स इस्टर्न केप (Sunrisers Eastern Cape) संघाने इतिहास रचला आणि सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. फायलनच्या सामन्यात सनरायझर्स संघाने डर्बन सुपर जायंट्स (Durban Super Giants) संघाचा दारूण पराभव केला. सनरायझर्स संघाने 89 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव सामना जिंकल्याने सध्या कॅप्टन अडॅम मार्करम (Aiden Markram) याचं कौतूक होताना दिसतंय. फायनल सामना पाहण्यासाठी संघ मालक काव्या मारनही (Kavya Maran) स्टेडियममध्ये उपस्थित होती. त्यावेळी काव्याचा आनंद गगनात मावेना असा झाला होता. 

दक्षिण आफ्रिका टी-20 लीगच्या पहिल्या हंगामात देखील सनरायझर्स इस्टर्न केप संघाने वितेजेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर आता दुसऱ्या वेळी देखील त्यांनी विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. दक्षिण आफ्रिका टी-20 लीगच्या दुसऱ्या सत्राच्या अंतिम सामन्यात सनरायझर्स इस्टर्न केप संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांच्या सामन्यात 4 गडी गमावून 204 धावा केल्या होत्या. सनरायझर्सची फलंदाजी पाहून काव्या मारनने आनंदोत्सव साजरा केला.

सनरायझर्स इस्टर्न केपच्या टॉम एबल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी संघासाठी उत्कृष्ट अर्धशतकं झळकावली. एबलने 34 चेंडूत 55 धावा केल्या तर ट्रिस्टनने 30 चेंडूत 56 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. याशिवाय जॉर्डिन हरमन आणि कर्णधार एडन मार्करामने प्रत्येकी 42 धावांचे योगदान दिलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना डरबनचा संपूर्ण संघ 17 ओव्हरमध्ये केवळ 115 धावांवरच करू शकला अन् सनरायझर्सला दणक्यात विजय मिळवता आलाय. फायनलमध्ये विजयानंतर काव्या मारनने आनंद व्यक्त केलाय. मला मॅच पाहताना मजा आली. आमच्या संघाने उत्तम कामगिरी केलीये. आमचे खेळाडू खूप जिद्दीने घेतले आणि फायनल जिंकवली याचा मला आनंद आहे, असं काव्या मारनने म्हटलं आहे.

कोणाला किती रक्कम मिळाली? (SAT20 2024 Prize Money)

एडन मार्करमच्या संघाला ट्रॉफीसह सुमारे 15.06 कोटी रुपयांची मोठी रक्कम देण्यात आली आहे. डर्बन सुपर जायंट्सला उपविजेते म्हणून जवळपास 7.31 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पारल रॉयल्सला 3.94 कोटी रुपये देण्यात आले आहेत. चौथ्या स्थानावर असलेल्या जॉबर्ग सुपर किंग्सला 3.47 कोटी रुपये, पाचव्या स्थानावर असलेल्या प्रिटोरिया कॅपिटल्सला 1.10 कोटी रुपये आणि शेवटच्या अर्थात सहाव्या स्थानावर असलेल्या एमआय कॅपिटल्सला 88.61 लाख रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली आहे.