MS Dhoni : 'धोनी त्यादिवशी ढसाढसा रडला...', माजी कोचने सांगितला ड्रेसिंग रूममधील हृदयस्पर्शी अनुभव!

Sanjay Bangar On MS Dhoni : वर्ल्ड कप सेमीफायनलमधील पराभवानंतर (India vs New Zealand) महेंद्रसिंह धोनी ढसाढसा रडला, असं माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी म्हटलं आहे.

सौरभ तळेकर | Updated: Oct 22, 2023, 09:32 PM IST
MS Dhoni : 'धोनी त्यादिवशी ढसाढसा रडला...', माजी कोचने सांगितला ड्रेसिंग रूममधील हृदयस्पर्शी अनुभव! title=
Sanjay Bangar On MS Dhoni

India vs New Zealand : टीम इंडिया गेल्या 20 वर्षापासून वनवास भोगत आहे. गेल्या 5 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला एकदाही पराभूत केलं नाही. त्यामुळे आता आजच्या सामन्यात किंवीचा पराभूत करून रेकॉर्ड मोडण्याची तयारी टीम इंडियाने केली आहे. मागील वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये (2019 World Cup Semis) आमने-सामने आले होते. त्यावेळी धोनी (MS Dhoni) रनआऊट झाला अन् टीम इंडियाच्या फायनलमध्ये जाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. भारताच्या पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये नाराजीचं वातावरण होतं. त्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये नक्की काय काय झालं? याचा खुलासा माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी केला आहे.

इंग्लंडमध्ये 2019 मध्ये वर्ल्ड कप खेळवला गेला होता. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफानयल सामना रंगत आला होता. टीम इंडियाचा तारणहार महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जडेजा मैदानात पाय रोवून उभे होते. त्याचवेळी धोनी दोन धावा घेण्याच्या नादात रनआऊट झाला अन् अख्ख्या मैदानात शांतता पसरली. टीम इंडियाने हा सामना 18 रन्सने गमावला. 

काय म्हणाले Sanjay Bangar ?

पराभवानंतर टीम इंडियाचा चेहरा उतरला होता. ड्रेसिंग रुममध्ये पोहोचल्यानंतर खेळाडू लहान मुलांसारखे रडत होते. धोनी देखील लहान मुलांसारखं रडत होता. हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत यांच्या डोळ्यातही अश्रू होते, असा अनुभव संजय बांगर यांनी सांगितला आहे. असे किस्से ड्रेसिंग रुमबाहेर येत नाहीत, ते तिथेच राहतात, असंही बांगर (Sanjay Bangar On MS Dhoni) यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा - IND vs NZ : रविंद्र जडेजाने सोडला कॅच अन् पत्नी रिवाबाला बसला धक्का!

दरम्यान, रविंद्र जडेजाने या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने टीम इंडियाचा डाव सावरला होता. जड्डूने 84 चेंडूत 77 धावांची खेळी केली. यामध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. तर दुसरीकडे एमएस धोनी याने देखील 72 चेंडूत 50 धावांची खेळी होती. धोनीच्या या संथ खेळीमुळे त्याच्यावर टीका देखील झाली होती.