इशारो इशारो मे....ऑस्ट्रेलियाचे माजी स्पिनर शेन वॉर्न यांचा अभिनेत्रीवर जडला जीव

 वॉर्न यांच्या एक्स वाइफची भूमिका त्यांच्या सिनेमात या अभिनेत्रीने करावी अशी त्यांची इच्छा देखील आहे. त्यामुळे ही अभिनेत्री वॉर्न यांची ऑफर स्वीकारणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

Updated: May 11, 2021, 10:55 AM IST
इशारो इशारो मे....ऑस्ट्रेलियाचे माजी स्पिनर शेन वॉर्न यांचा अभिनेत्रीवर जडला जीव title=

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा माजी स्पिनर गोलंदाज शेन वॉर्न यांनी क्रिकेट विश्वात आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मोठं नाव कमवलं आहे. शेन वॉर्न यांची चर्चा आता वेगळ्याच गोष्टीसाठी होत आहे. शेन वॉर्न यांना एका अभिनेत्रीचं वेड लागलं आहे. वयाच्या 51 व्या वर्षी अभिनेत्रीवर त्यांचा जीव जडल्याचं काही इन्स्टा पोस्टमधून समोर आलं आहे. 

शेन वॉर्न आणि हॉलिवूड अभिनेत्री मार्गो रॉबी यांच्यातील जवळीक वाढत असल्याचे दिसते. अलीकडच्या काळात वॉर्न ऑस्ट्रेलियातील अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याचं सोशल मीडिया पोस्टवरून दिसत आहे. या अभिनेत्रीच्या जवळपास सर्वच इन्स्टा पोस्टला लाईक करून त्यावर वॉर्न हे कमेंट करत असल्याचं दिसत आहे. रॉबीच्या पोस्टवर कमेंट करताना वॉर्न म्हणाले की,  'कीप रॉकिंग इट' 

मिळालेल्या माहितीनुसार शेन वॉर्न आपल्या जीवनावर आधारित चित्रपट काढणार आहेत. त्यासाठी त्यांचं काम देखील सुरू आहे. अभिनेत्री मार्गो रॉबीने या चित्रपटात काम करावं अशी वॉर्न यांची खूप इच्छा आहे. 

या अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर वॉर्न आपली काही ना काही प्रतिक्रिया देत असतात. त्यावरून त्यांच्यातील जवळीक लक्षात येऊ शकते. वॉर्न यांच्या एक्स वाइफची भूमिका त्यांच्या सिनेमात या अभिनेत्रीने करावी अशी त्यांची इच्छा देखील आहे. त्यामुळे ही अभिनेत्री वॉर्न यांची ऑफर स्वीकारणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.